Nothing Phone 1 : पूर्वीपेक्षा महाग झाला नथिंग फोन 1; कंपनीने वाढवली किंमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nothing phone 1 price hiked by rs 1000 for all variants in india check new prices and all details

Nothing Phone 1 : पूर्वीपेक्षा महाग झाला नथिंग फोन 1; कंपनीने वाढवली किंमत

पारदर्शक दिसणारा Nothing Phone 1 खरेदी करण्यासाठी आता भारतीयांना अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत, कारण कंपनीने त्याची किंमत वाढवली आहे. कंपनीने गुरुवारी जाहीर केले की भारतातील नथिंग फोन 1 च्या सर्व व्हेरिएंटची किंमत 1,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. करंसी एक्सचेंज रेट्सट्या चढउतारासह इतर कारणांमुळे स्मार्टफोनच्या किमतीत वाढ झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात भारतासह जगभरात लॉन्च करण्यात आला होता. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G+ चिपसह 6.55-इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे.

Nothing Phone 1 नथिंग फोन 1 ची किंमत

नथिंगनुसार, भारतात नथिंग फोन 1 ची किंमत आता बेस 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 33,999 रुपयांपासून सुरू होईल.आता त्याचा 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 36,999 रुपयांना आणि टॉप-ऑफ-द-लाइन 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 39,999 रुपयांना उपलब्ध होईल. म्हणजेच, सर्व व्हेरिएंट आता लॉन्च किंमतीपेक्षा 1,000 रुपये महाग झाले आहेत. कंपनीने सांगितले की नवीन किंमत आजपासून लागू होईल.

कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , आम्ही फोनचे उत्पादन सुरू केल्यापासून बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झाला आहे. करंसी एक्सचेंज रेट मधील चढउतार आणि वाढत्या चक्रवाढ खर्च यासारख्या आर्थिक घटकांमध्ये देखील बदल झाला आहे. सध्याचे वातावरण पाहता, आम्हाला आमच्या किंमती बदलाव्या लागल्या आहेत.

हेही वाचा: मारुतीची नवीन Alto K10 लाँच; देते 25km मायलेज

Nothing Phone 1 चे स्पेसिफिकेशन्स

नथिंग फोन 1 मध्ये 6.55-इंच फुल-एचडी+ (1,080x2,400 पिक्सेल) OLED डिस्प्ले 120Hz अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षणासह देण्यात आलेला आहे. स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G+ चिपसह 12GB पर्यंत LPDDR5 RAM सह जोडलेला आहे. यात दोन 50-मेगापिक्सेल सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी पुढील बाजूस 16-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. नथिंग फोन 1 256GB पर्यंत UFS 3.1 इनबिल्ट स्टोरेज ऑफर करतो. यामध्ये 4500mAh बॅटरी मिळते 33W वायर्ड चार्जिंग, 15W Qi वायरलेस चार्जिंग आणि 5W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. इतर फीचर्समध्ये फेस रिकग्निशन , वॉटर आणि डस्ट रेजिस्टंन्ससाठी IP53 रेटिंग, ड्युअल स्टीरिओ स्पीकर, तीन मायक्रोफोन आणि पर्सनलाइज्ड लाइटिंग इफेक्टसह ग्लिफ इंटरफेस यांचा समावेश आहे.

हेही वाचा: एअरटेलचा 28 दिवसांचा प्लॅन; दररोज 2.5GB डेटासह मिळेल अजून बरंच काही

टॅग्स :Technology