Nothing Phone 3 स्मार्टफोनची 'या' तारखेला भारतात एंट्री! आकर्षक डिझाइन, AI फीचर्स अन् जबरदस्त कॅमेरा, किंमत फक्त..

Nothing Phone 3 launch date features price : नथिंग फोन 3 भारतात ३ जुलैला लाँच होणार असून यामध्ये फ्लॅगशिप फीचर्स आणि एआय तंत्रज्ञानाचा समावेश असेल.
Nothing Phone 3 launch date features price
Nothing Phone 3 launch date features priceesakal
Updated on

Nothing Phone 3 Details : स्मार्टफोनच्या दुनियेत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला Nothing ब्रँड पुन्हा एकदा जबरदस्त एन्ट्रीसाठी सज्ज झाला आहे. Nothing ने अधिकृतपणे घोषणा केली आहे की Nothing Phone 3 हा 3 जुलै 2025 रोजी भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीच्या X (पूर्वीचं ट्विटर) हँडलवरून एक टीझर व्हिडिओ शेअर करत याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये "3" हा आकडा झळकत असून 6 सेकंदाच्या या व्हिडिओने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

फोनची संभाव्य किंमत आणि फीचर्स

Nothing चे CEO Carl Pei यांनी नुकतेच फोनच्या संभाव्य किंमतीबाबत संकेत दिले असून ती £800 (सुमारे 90 हजार) इतकी असू शकते. या किंमतीत वापरकर्त्यांना प्रीमियम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे.

डिझाइनमध्ये बदल

Nothing Phone 3 मध्ये यावेळी खास डिझाइन अपग्रेड दिसून येणार आहे. OnePlus 12 प्रमाणे गोल कॅमेरा सेटअप दिला जाणार असून, मागील बाजूस Glyph Interface असेल, जो कॉल, मेसेज किंवा नोटिफिकेशन्ससाठी लाइटिंग अलर्ट देईल. हे डिझाइन आधीपासूनच Nothing ची खास ओळख बनली आहे.

Nothing Phone 3 launch date features price
Car New Rules Maharashtra : महाराष्ट्रात नवीन कार घेणं कठीण होणार, महायुती सरकारच्या पार्किंग नियमानं वाढवलं टेन्शन

डिस्प्ले आणि परफॉर्मन्स

6.77 इंचाचा AMOLED LTPO डिस्प्ले

120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 nits पर्यंत ब्राइटनेस

यामुळे गेमिंग, व्हिडिओ आणि स्क्रोलिंगचा अनुभव प्रीमियम असेल.

प्रोसेसर आणि बॅटरी

Snapdragon 8 Gen 3 चिपसेट

12GB RAM आणि 512GB स्टोरेज पर्यंत पर्याय

5,000mAh बॅटरी, जी 50W वायर्ड आणि 20W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल

Nothing Phone 3 launch date features price
Chandrayaan 5 Explainer : चंद्रावर भारताची पुन्हा एकदा झेप, ISRO अन् जपानची 'चंद्रयान-5' मोहीम आहे तरी काय? वाचा सविस्तर

AI फिचर्स

  • Nothing Phone 3 मध्ये काही इनोव्हेटिव्ह AI फीचर्स असण्याची शक्यता आहे

  • Circle-to-Search स्क्रीनवर सर्चसाठी अगदी सोपी पद्धत

  • Smart Drawer अॅप्सचे स्मार्ट मॅनेजमेंट

  • Voice Transcription आवाजाचं थेट मजकुरात रूपांतर

  • इनबिल्ट AI असिस्टंट

  • Triple 50MP रिअर कॅमेरा सेटअप

  • 32MP फ्रंट कॅमेरा उत्तम सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी

Nothing Phone 3 launch date features price
Jayant Naralikar : नारळीकरांनी स्टीफन हॉकिंगला हरवलं तो दिवस..! सर्वाधिक प्रश्न विचारणारा विद्यार्थी अन् केम्ब्रिजच्या आठवणी

Nothing Phone 3 हा केवळ एक फोन नसून, एक प्रीमियम तंत्रज्ञानाचा अनुभव देणारी डिव्हाईस ठरणार आहे. आकर्षक डिझाइन, जबरदस्त परफॉर्मन्स, AI ची ताकद आणि ग्लायफ लाईटिंगसह येणारा हा फोन 2025 मधील सर्वात चर्चेतला फ्लॅगशिप ठरू शकतो. 3 जुलै 2025 ला या फोनची अधिकृत झलक पाहायला मिळेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com