esakal | Jio वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपवरुन करू शकतील मोबाईल रिचार्ज, जाणून घ्या प्रोसेस
sakal

बोलून बातमी शोधा

Jio

Jio वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपवरुन करू शकतील मोबाईल रिचार्ज

sakal_logo
By
टिम ई-सकाळ

रिलायन्स जिओने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला तुमचा मोबाईल फोन रिचार्ज करणे अगदी सोपे होईल. आता जिओ यूजर्स (Jio Users) थेट व्हॉट्सअ‍ॅपवरून (WhatsApp) रिचार्ज करू शकतील. इतकेच नाही तर तुम्ही रिलायन्स जिओ वापरत असाल तर पेमेंट आणि इतर सुविधांचा आनंद देखील व्हॉट्सअ‍ॅपवरून घेऊ शकाल. जिओने नुकतेच व्हॉट्सअ‍ॅप सोबत इंटिग्रेड केले असून याचा थेट उपयोग जियो फायबर (JioFiber), जिओमार्ट (JioMart) वॉट्सअ‍ॅपवरूनही वापरण्यासाठी करता येणार आहे. (now jio users can recharge mobile number using whatsapp)

रिचार्ज कसा कराल?

तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवरून जिओ सिम रिचार्ज करायचे असेल तर तुम्हाला मोबाइल फोनमध्ये 70007 70007 नंबर सेव्ह करावा लागेल. यानंतर रिचार्ज प्रोसेस सुरु करण्यासाठी वापरकर्त्याला 70007 77007 या क्रमांकावर मेसेज पाठवावा लागेल. Hii असा मॅसेज पाठवल्यानंतर ताबडतोब रिचार्जची प्रक्रिया सुरू होईल. यानंतर तुम्हाला ई-वॉलेट, यूपीआय, क्रेडिट आणि डेबिट कार्ड्ससारखे सर्व प्रकारचे पेमेंट ऑप्शन्स व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध असतील. जिओ वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवरून अशा अनेक सेवांचा आनंद घेता येणार आहे. रिलायन्स जिओ वॉट्सअ‍ॅपवरुन आपल्या अनेक सेवांमध्ये वापरकर्त्यांना सहज एक्सेस देत आहे जेणेकरून ग्राहकांना त्यांचे जिओ फायबर (JioFiber) आणि जियोमार्ट (JioMart) अकाउंट अधीक सोप्या पध्दतीने वापरता येणार आहे.

हेही वाचा: मारुतीची Wagon R आता येणार इलेक्ट्रिक मॉडेलमध्येही; टेस्टिंगच्या वेळी दिसली झलक

कोणत्या सुविधा मिळतील

  • ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपवरुन जिओ सिम रिचार्ज करू शकतील.

  • व्हॉट्सअ‍ॅप वापरुन तुम्ही नविन जियो सिम कार्ड विकत घेऊ शकाल त्यासोबतच सिम कार्ड पोर्ट-इन (MNP) सुध्दा करता येईल

  • व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने ग्राहकांना जिओ सपोर्ट देखील मिळू शकेल.

  • ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपवरुन JioFiber संदर्भात सपोर्ट मिळेल

  • व्हाट्सएपवरून जिओच्या इंटरनेट रोमिंगला सपोर्ट मिळेल.

  • ग्राहकांना JioMart संबंधी माहिती व्हॉट्सअ‍ॅपवरुन मिळेल

  • व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने जिओ यूजर्सना अनेक भाषांचा सपोर्ट मिळेल. सुरुवातीला ही सुविधा हिंदी व इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल. यानंतर, इतर भाषांमध्ये या सुविधेचा आनंद घेता येईल.

  • (now jio users can recharge mobile number using whatsapp)

हेही वाचा: अ‍ॅमेझॉनचे Sidewalk फिचर लाँच; शेजाऱ्यांसोबत शेअर करा इंटरनेट