Gamified sanskrit learning app : आता घर बसल्या शिका संस्कृत; मोबाइल अप्लिकेशन झाले लाँच

little guru
little guru

नागपूर : संस्कृत शिकवणाऱ्या ‘लिटिल गुरू’ या ॲपचे उद्घाटन झाले आहे. विद्यार्थी, अध्यात्मिक क्षेत्रातले अभ्यासक, इतिहासतज्ज्ञ आणि इतरांना संस्कृत भाषेची अधिकाधिक माहिती व्हावी, संस्कृत शिकणे सोपे जावे यासाठी भारतीय सांस्कृतिक व्यवहार परिषदेच्या पुढाकारातून हे ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपद्वारे सोप्या पद्धतीने स्पर्धा, परिसंवाद अशा मनोरंजनात्मक रीतीने, खेळांच्या माध्यमातून संस्कृतचे धडे दिले जाणार आहेत. अशा प्रकारचे ॲप तयार करण्याची मागणी परदेशातील भारतीयांकडून आणि संस्कृतमध्ये रूची असणाऱ्या परदेशी नागरिकांकडून होत होती. बौद्ध, जैन आणि काही इतर धार्मिक लेखन संस्कृत भाषेत असल्याने अनेक देशांच्या नागरिकांमध्ये संस्कृतविषयी मोठी उत्सुकता आहे.

little guru
आता Google Photos वरील डिलीट केलेले फोटोज करा Restore; जाणून घ्या काही स्टेप्स

जगातील पहिले गेमफिड (गॅमीफाइड) संस्कृत शिकण्याचे अ‍ॅप लाँच करण्यात आले असून, ‘लिटिल गुरू’ असे अ‍ॅपचे नाव आहे. इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनशिपने (आयसीसीआर) स्थापना दिवसानिमित्त संस्कृत ॲप सुरू केले. हे जगातील पहिले गॅमिफाइड संस्कृत लर्निंग अ‍ॅप आहे. आयसीसीआरने चीनच्या बीजिंग येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी आयसीसीआरचे विद्वानही उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान आयसीसीआरने ‘लिटिल गुरू’ ॲपचे अनावरण केले आणि जगातील पहिले गेमफिट संस्कृत शिकणे ॲप असल्याचे सांगितले. बीजिंगमध्ये भारतीय राजदूत विक्रम मिस्त्री आणि संस्कृत आणि भारतीय अभ्यासातील नामांकित अभ्यासक यांच्या उपस्थितीत हे ॲप लाँच केले.

‘लिटिल गुरू’ अ‍ॅप खास संस्कृत शिकण्यासाठी तयार केले गेले आहे. हे अ‍ॅप गेमफिडवर आधारित आहे. हे एक संवादात्मक प्लॅटफॉर्म आहे आणि याद्वारे संस्कृत शिकणे सोपे जाते. संवाद साधण्याचा सोपा मार्ग वापरून संस्कृत शिकण्याची इच्छा असणारे लोक संस्कृत शिकू शकतात. ‘लिटिल गुरू’ अ‍ॅप तयार करण्यासाठी गेमॲप स्पोर्टस्विझ टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीबरोबर करार झाला आहे. या ॲपच्या तयारी दरम्यान बदलत्या तंत्र आणि बदलण्याच्या शिकण्याच्या पद्धतींची काळजी घेण्यात आली आहे.

गुगल प्लेस्टोअरवरही उपलब्ध

तुम्हाला संस्कृत शिकायचे असेल तर गुगल प्लेस्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला Google Play Store वर जावे लागेल आणि शोध बारमध्ये संस्कृत लर्निंग ॲप टाइप करावे लागेल. त्यानंतर तुम्ही अ‍ॅपचे सर्व तपशील तपासू शकता. पसंतीच्या आधारे अ‍ॅप डाउनलोड करू शकता.

little guru
Online Passport: कोरोनाकाळात पासपोर्ट काढायचा आहे? मग या ऑनलाइन स्टेप्स करा फॉलो

चीनमध्ये संस्कृत अनेक वर्षांपासून

‘लिटिल गुरू’ अ‍ॅपच्या लाँचिंगवेळी सुप्रसिद्ध संस्कृत अभ्यासक आणि पेकिंग विद्यापीठात चीन-इंडियन बौद्ध स्टडीज, ओरिएंटल अँड इंडियन स्टडीज इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर वांग बैंगवाई हेदेखील उपस्थित होते. वांग बैंगवई यांच्या मते संस्कृत हा भारतीय संस्कृतीचे मूळ आहे आणि चीनमध्येही याला चांगलेच पसंत केले आहे. पेकिंग युनिव्हर्सिटी हे चीनमधील सर्वांत प्राचीन विद्यापीठांमधील एक आहे आणि विद्यापीठाने संस्कृत शिकवणे सुरू केल्याला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होणार आहे.

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com