आता WhatsApp स्टेटसलाही बनवता येणार Facebook Story

वृत्तसंस्था
रविवार, 7 जुलै 2019

- WhatsApp ने यापूर्वी आणले होते Status फिचर्स

- आता WhatsApp Status ला बनविता येणार Facebook Story.

नवी दिल्ली : सोशल मीडियापैकी एक असलेल्या WhatsApp चा वापर सध्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे WhatsApp कडूनही आपल्या युजर्ससाठी नव-नवे फिचर्स दिले जात आहेत. त्यानंतर आता WhatsApp Status फेसबुक आणि इतर अ‍ॅपवरही शेअर करता येणार आहे.

WhatsApp ने काही महिन्यांपूर्वी Status ठेवण्यासाठी फिचर दिले होते. या माध्यमातून Status ला फोटो सेट करता येत आहे. त्यानंतर आता WhatsApp Status आता फेसबुक आणि इतर अ‍ॅपवर शेअर करता येणार आहे. सध्या हे फीचर WhatsApp च्या BETA व्हर्जनसाठी उपलब्ध आहे. WhatsApp Status फेसबुकवर शेअर करायचे असल्यास Android फोनमध्ये फेसबुक किंवा फेसबुक लाईट तर आयफोनमध्ये फेसबुक असणे गरजेचे आहे. 

अशाप्रकारे बनविता येईल Facebook Story : 

- सर्वप्रथम WhatsApp च्या My Status वर जा. येथे Share to Facebook वर टॅप करा.  

- Allow वर टॅप केल्यांतर समोर फेसबुक अ‍ॅप ओपन होईल. 

- फेसबुकवर तुम्हाला ज्या लोकांसोबत स्टेटस शेअर करायचं आहे ते लोक सिलेक्ट करा.  त्यानंतर Share Now वर टॅप करा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Possible share whatsapp status to facebook stories