
गुगल मॅपला टक्कर देण्यासाठी एक स्वदेशी नेव्हिगेशन ॲप येणार आहे. इतकंच नव्हे तर ISROनही या ॲपला मदत करण्याची तयारी दाखवली आहे. आणि याच ॲपबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नागपूर : अशी कुठली ॲप आहे जीला जगातील कुठलीही गोष्ट विचारा त्याचं उत्तर मिळणार म्हणजे मिळणार असा प्रश्न कोणी विचारल्यास आपल्या तोंडातून आपसूकच 'गुगल' हे नाव येईल. अगदी पदार्थांच्या कृती सांगण्यापासून तर रस्ता शोधण्यापर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये गुगल आपल्याला मदत करते. हरवलेला किंवा कमी ट्रॅफिकचा रस्ता आपल्याला नेहमीच गुगल मॅप सांगतो. मात्र आता याच गुगल मॅपला टक्कर देण्यासाठी एक स्वदेशी नेव्हिगेशन ॲप येणार आहे. इतकंच नव्हे तर ISROनही या ॲपला मदत करण्याची तयारी दाखवली आहे. आणि याच ॲपबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
लोकेशन आणि नेव्हिगेशन पुरवणाऱ्या 'मॅप माय इंडिया' या कंपनीनं ISROबरोबर टायअप करून ही स्वदेशी नेव्हिगेशन ॲप तयार करणार आहेत. या कंपनीचे सीईओ रोहन वर्मा यांच्या म्हणण्याप्रमाणे ISRO या कंपनीला सॅटेलाईट इमेज आणि ऑबझर्व्हेशन डाटा उपलब्ध करून देणार आहे. ज्याद्वारे मॅप बनवण्यात येईल. आता लोकांना गुगल मॅपवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. तसंच आत्मनिर्भर भारताकडे हे एक पाऊल असेल असं ते म्हणाले.
स्वदेशी सॅटेलाईट पुरवणार माहिती
NaviC (Navigation with Indian Constellation) हे ISROनं तयार केलेलं भारताचं स्वतःचं नेव्हिगेशन सिस्टम आहे. तसंच Bhuvan भारताचे जियो पोर्टल आहे. या दोन्ही स्वदेशी सॅटेलाईट्सच्या मदतीनं 'मॅप माय इंडिया'ला डाटा पुरवण्यात येणार आहे.
या ॲपची काही वैशिष्ट्य
संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ