WhatsApp New Update Released : आता प्रोफाईल पिक्चरवरच दिसणार यूजर्सचं स्टेटस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp

WhatsApp New Update Released : आता प्रोफाईल पिक्चरवरच दिसणार यूजर्सचं स्टेटस

WhatsApp New Update Released : आज जगभरात करोडो लोग व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत आहेत. कोणत्याही अडचणींशिवाय या प्लॅटफॉर्मचा आनंद यूजर्सला घेता यावा यासाठी वेळोवेळी अपडेट देत असते. असेच एक भन्नाट अपडेट व्हॉट्सअपने त्यांच्या यूजर्ससाठी जारी केले आहे. यातील सर्वात मोठे वैशिष्ट्य स्टेटसशी संबंधित आहे.

हेही वाचा: Whatsapp History: प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेलं व्हॉट्सअॅप चालतं कसं?

जारी करण्यात आलेले हे फिचर इंस्टाग्राम सारखेच असून, आता तुम्ही युजर्सच्या प्रोफाईलवर त्याचे स्टेटस पाहू शकणार आहात. नवीन फीचर अंतर्गत जेव्हा तुम्ही युजरच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला त्या यूजरचे स्टेटस सिम्बॉल त्याच्या फोटोवर दिसेल.

जर संबंधित यूजरने स्टेटस अपडेट केले असेल तर, त्याच्या प्रोफाइल फोटोभोवती हिरवे किंवा निळे वर्तुळ दिसेल. त्यावर क्लिक करताच तुम्हाला त्याचे स्टेटस दिसून येईल. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या अपडेटमध्ये इतरही अनेक नवीन फीचर्स देण्यात आली आहेत.

हेही वाचा: WhatsApp : व्हॉट्सअॅप डेटा अँड्रॉइडमधून आयओएसमध्ये कसा ट्रान्सफर कराल ?

नव्या अपडेटमध्ये दुसरे महत्त्वाचे फिचर म्हणजे ग्रुप कॉलिंग लिंक आणि स्टेटस इमोजी रिप्लाय. तसेच Hide Online Status चा पर्यायही देण्यात आला आहे. या सेटिंगद्वारे तुम्ही तुमचे ऑनलाइन स्टेटस इतरांपासून लपवून ठेवू शकता.

वरील अपडेटशिवाय मेटा कंपनी व्हॉट्सअ‍ॅप मेसेज एडिटिंगवरही काम करत आहे. हे अपडेट आल्यानंतर यूजर्सला पाठवलेला मेसेज सहज एडिट करणं शक्य होणार आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील ५१२ सदस्यांची सध्याची मर्यादा १०२४ करण्याचीही कंपनीची योजना आहे. याशिवाय लवकरच यूजर्सला लवकरच व्ह्यू वन्स मोड नावाचे फिचरदेखील मिळणार आहे. यामध्ये तुम्ही मेसेज, इमेज किंवा व्हिडिओ पाठवल्यास रिसीव्हर त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीये.