क्या बात है! आता इंस्टाग्रामच्या रिल्सना फेसबुकच्या न्यूज फिडमध्ये करा शेअर; येणार नवीन फिचर 

Now users can share instagram reals to facebook news feed
Now users can share instagram reals to facebook news feed

नागपूर : लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या यूजर्सना सुविधा देण्यासाठी नवीन फीचरची चाचणी सुरू केली आहे. या फीचरच्या मदतीने फेसबुक इन्स्टाग्राम रील्स फेसबुक न्यूज फीडमध्ये शेअर करता येणार आहे. याच फीचरबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

इंस्टाग्राम रील्स मागील वर्षी भारतात लॉन्च करण्यात आली होती. हा टिकटॉकचा पर्याय आहे ज्याला भारतात बंदी घातली गेली आहे. म्हणूनच फेसबुक युजर्सना एक फीचर मिळणार आहे आणि हे फीचर वापरुन ते फेसबुक न्यूज फीडमध्ये इन्स्टाग्राम रीलच्या छोट्या व्हिडियो क्लिप्स सहज शेअर करू शकाल. 

एका अहवालानुसार फेसबुकने नवीन फीचरची चाचणी सुरू केली असून ती लवकरच युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसं बघितलं तर फेसबुकचे स्वतःचे मुख्य रील्सही आहेत. तिथे यूजर्स त्यांना आवडेल असे लहान व्हिडिओ तयार करू शकतात. रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, 'आम्ही भारतात इंस्टाग्राम निर्मात्यांसाठी फीचरची चाचणी घेत आहोत, त्यानंतर ते फेसबुकच्या न्यूज फीडमध्ये त्यांची रील शेअर करू शकतील. ज्याद्वारे ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल असे फेसबुकचे म्हणणे आहे. 

आपल्याला इन्स्टाग्रामच्या फीचर बॉटमध्ये कॅमेराच्या जवळ इन्स्टाग्राम रील्सचा पर्याय दिसेल. जिथे बर्‍याच प्रकारची सर्जनशील संपादन साधने दिली गेली आहेत. यात ऑडिओ, एअर इफेक्ट, टाइमर आणि काउंटडाउन, गती साधने समाविष्ट आहेत. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com