WhatsApp ची मोठी घोषणा; आता युजर्संना अ‍ॅपवरुनच पेन्शनसह इन्शुरन्सही खरेदी करता येणार

Whatsapp, Whatsapp Payment, Insurance, Tech News
Whatsapp, Whatsapp Payment, Insurance, Tech News

भारतातील लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपनं  (WhatsApp) मागील महिन्यात देशभरात पेमेंट सेवा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. Facebook Fuel for India 2020 या कार्यक्रमात त्यांनी या वर्षाच्या अखेरपर्यंत ‘अफोर्डेबल सॅशे साइज्ड’ आरोग्य विमा (Health Insurance) सेवा पुरवणार असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आता विमा पॉलिसी घेणं देखील शक्य होणार आहे. आपल्या ग्राहकांना ही सेवा देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने  SBI General Insurance Co. Ltd. सोबत एक करार देखील केलाय. याशिवाय HDFC च्या माध्यमातून कंपनी पेन्शनसंदर्भातील पॉलिसीही देऊ शकते.  

फेसबुक फ्यूल फॉर इंडिया 2020 या कार्यक्रमात व्हॉट्सअ‍ॅप इंडियाचे प्रमुख अभिजीत बोस म्हणाले की, या वर्षांच्या अखेरपर्यंत एसबीआचे किफायतशीर विमा पॉलिसी व्हॉट्सअ‍ॅपवरुन घेणं शक्य होईल. याशिवाय एचडीएफसी पेन्शन प्लॅनही व्हॉट्सअ‍ॅपवरुन घेता येऊ शकतील. ज्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर असेल, असा दावाही त्यांनी केला.

WhatsApp Pay से लेनदेन की हुई शुरुआत

व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट सेवा देशभरात सुरु झाली आहे. जवळपास 2 कोटी युजर्संना याचा लाभ घेऊ शकतात.  भारतीय स्टेट बँक (एसबीआय), एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सिस बँकेशी करार करुन व्हॉट्सअ‍ॅप आपल्या ग्राहकांना पेमेंटची सुविधा पुरवत आहे.  

व्हॉट्सअ‍ॅपवरुन पैसे पाठवण्याची प्रक्रिया नेमकी कशी आहे

>> सर्वात प्रथम ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचा चॅट बॉक्स ओपन करा. त्यानंतर Attach वर क्लिक करुन  Payment चा पर्याय निवडावा लागेल.

>> त्यानंतर Continue हा पर्यायवर क्लिक करुन डेबिड कार्डची माहितीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 

>>  डेबिट कार्डच्या अखेरचे 6 डिजिट, एक्सपारी डेट नंतर Done पर्याय सिलेक्ट करावा लागतो.  

>> त्यानंतर UPI PIN सेट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला OTP मिळेल. तो ऑटोमॅटिक सब्मिट होतो. जर ऑटोमॅटिक OTP स्विकारला गेला नाही तर तुम्हाला मॅन्यूअली तो फिल करावा लागेल. 

>>  Set UPI Pin प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही पैसे पाठवू शकता
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com