
आगीच्या घटनेनंतर 'या' कंपनीने परत मागवल्या हजारो इलेक्ट्रिक स्कूटर
सध्या देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपा्ट्याने वाढत आहे. यातच देशातील इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटनांदरम्यान लोकप्रिय इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांपैकी एक असलेल्या ओकिनावा ऑटोटेकने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या प्रेझ प्रो स्कूटर (praise pro electric scooter) चे 3215 युनिट्स परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच कंंपनी ग्राहकांना स्कूटरच्या बॅटरीमध्ये काही दोष असल्यास ताबडतोब दुरुस्त करुन देईव, असे ओकिनावाने म्हटले आहे. ओकिनावा कंपनी गाड्यांसाठी आयोजित करत असलेल्या हेल्थ चेकअप शिबिरांचा हा एक भाग आहे.
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे, बॅटरी लूज कनेक्टर किंवा कोणत्याही डॅमेज झाला आहे का हे तपासले जाईल आणि ओकिनावा अधिकृत डीलरशिपवर फ्री दुरुस्ती केली जाईल, दुरूस्तीमध्ये कोणतीही गैरसोय होणार नाही याची खात्री घेण्यासाठी कपनी डिलरशीप्ससोबत मिळून यावर काम करत आहे, तसेच यासाठी, कंपनी स्वतः ग्राहकांशी संपर्क साधत आहे, असे सांगण्यात आले आहे. या कंपनीचे देशभरात सुमारे 500 डीलर्सचे नेटवर्क आहे.
हेही वाचा: "PM मोदी गप्प का आहेत"; 13 विरोधी पक्षांचा सरकारवर एकत्रित हल्लाबोल
देशात वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इलेक्ट्रिक स्कूटर्सना आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. अलीकडे जितेंद्र इलेक्ट्रिकच्या सुमारे 40 इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) आग लागली होती. कारखान्यातून कंटेनरमध्ये ई-स्कूटर नेत असताना हा अपघात झाला.
यापूर्वीही ओला आणि प्युअर ईव्हीच्या स्कूटरला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. 28 मार्च रोजी पुण्यात Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली होती. या व्हायरल व्हिडिओमध्ये, मिडनाईट ब्लू कलर Ola S1 Pro आगीत जळताना दिसून आली होती. त्याचवेळी चेन्नईमध्ये प्युअर ईव्ही स्कूटरला आग लागल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
हेही वाचा: चंद्रकांत पाटलांचे प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात? पराभवानंतर चर्चेला उधाण
Web Title: Okinawa Autotech Recall 3215 Units Of Praise Pro Electric Scooters Catch Fire
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..