
Okinawa Okhi 90 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; एका चार्जवर चालते 160 km
सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. अनेक वाहन कंपन्या त्यांचे इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात घेऊन येत आहेत यातच Okinawa या कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Okinawa Okhi 90 भारतात लॉन्च केली आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास याची किंमत ही 1,21,866 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरु होते . तसेच कंपनीच्या मते, या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे त्यामुळे त्याचे नाव ओखी 90 असे आहे.
फीचर्स
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. Ockhi 90 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये LED इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले आहे, जे स्पीड, रेंज, बॅटरी चार्ज इत्यादी आवश्यक गोष्टी रीडआउट ऑफर करेल. यासोबतच, Ockhi 90 ई-स्कूटरमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, व्हेईकल अलर्ट, जिओ-फेन्सिंग, ई-कॉल, डायग्नोस्टिक्स, राइड बिहेविअर एनालिसीस यासरखे अने प्रगत फीचर्स दिले आहेत.
हेही वाचा: प्रतिक्षा संपली! या तारखेला लॉंच होणार OnePlus 10 Pro; वाचा डिटेल्स
बॅटरी
OKHI-90 ही स्कूटर 72V 50 AH लिथियम-आयन बॅटरी पॅकने सुसज्ज आहे, जी तुम्ही कधीही काढू आणि लावू शकता. Okinawa OKHI-90 ही 3800-वॅटची मोटर असलेली हाय परफॉर्मंस इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ही ई-स्कूटर दोन राइडिंग मोडसह येते, ज्यामध्ये इको आणि स्पोर्ट्स मोड यांचा समावेश आहे. स्पीडबद्दल बोलायचे झाले तर ही स्कूटर फक्त 10 सेकंदात 0 ते 90 kmph चा स्पीड पकडू शकते. इको मोडमध्ये, रायडर 55-60 किमी/तापर्यंत आणि स्पोर्ट्स मोडमध्ये 85-90 किमी/तापर्यंतचा वेग सहज गाठू शकते. रेंजबद्दल सांगायचे तर, OKHI-90 एका चार्जवर 160 किमी पर्यंत जाऊ शकते.
हेही वाचा: जिवंत जाळण्यापूर्वी लोकांना बेदम मारहाण; शवविच्छेदन अहवालात खुलासा
Web Title: Okinawa Okhi 90 Electric Scooter Launched In India Claims Up To 160 Km Range On Sports Mode
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..