
5 मिनिटात चार्ज होईल Ola Electric स्कूटर; इस्रायली कंपनीशी केला करार!
ओला इलेक्ट्रिकने स्टोअरडॉट या इस्त्रायली बॅटरी तंत्रज्ञान कंपनीमध्ये गुंतवणूक केली असून ही कंपनी एक्स्ट्रीम फास्ट चार्जिंग (XFC) तंत्रज्ञान असलेल्या बॅटरी बनवते. या भागीदारीसोबत कंपनीने एडवांस सेल मैनुफेक्चरिंग तसेच इतर बॅटरी टेक्नोलॉजी आणि नवीन एनर्जी सिस्टीमसह आपले मूळ R&D (संशोधन आणि विकास) वाढवण्याची योजना आखली आहे. या भागीदारीमुळे, ओला इलेक्ट्रिकला त्याच्या बॅटरीमध्ये स्टोअरडॉटचे एक्सएफसी तंत्रज्ञान वापरता येणार आहे. त्यानंतर फक्त 5 मिनिटांत 0 ते 100 टक्के बॅटरी चार्ज करता येणार आहे.
ओला इलेक्ट्रिक प्रेस रिलीज याद्वारे या भागीदारीबद्दल माहिती देण्यात आली आहे. मात्र, कंपनीने या भागीदारीचा आर्थिक तपशील उघड केलेला नाही. ओलाने आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हिलर गाड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी देशात सेल मैनुफेक्चरिंगसाठी गिगाफॅक्टरी उभारण्याची योजना आखली आहे. कंपनीने सरकारच्या PLI योजनेअंतर्गत प्रगत केमिस्ट्री सेल बॅटरी स्टोरेजसाठी आपली बोली आधीच सादर केली आहे.
हेही वाचा: एअरटेलचा 28 दिवसांचा प्लॅन; दररोज 2.5GB डेटासह मिळेल अजून बरंच काही
ओलाचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल म्हणाले, ईव्हीचे भविष्य अधिक चांगल्या, वेगवान आणि हाय एनर्जी डेंसिटी बॅटरीमध्ये आहे, जी फास्ट चार्जिंग करण्यास सक्षम आहे आणि हाय रेंज देते. आम्ही कोअर सेल आणि बॅटरी तंत्रज्ञानामध्ये माहिर आहोत. आम्ही कोर सेल आणि बॅटरी तंत्रज्ञान यामध्ये गुंतवणूक आणि आमच्या इन-हाउस क्षमता वाढवत आहोत, सोबतच जागतिक प्रतिभावंताना या कामासाठी कंपनीत घेतले जात आहे, असे त्यांनी सांगितले.
त्याच वेळी, स्टोअरडॉटचे सीईओ डोरन मायर्सडॉर्फ म्हणाले, दोन्ही कंपन्या झिरो इमिशन वर्ल्ड निर्माण करण्यासाठी, तसेच शहरांमध्ये स्वच्छ हवा आणि ईव्ही चालकांना चार्जिंगच्या वेळा आणि मर्यादांबद्दल काळजी करण्याची गरज राहणार नाही यासाठी वचनबद्ध आहेत. तसेच त्यांनी सांगितले की, ते स्टोअरडॉटचे एक्स्ट्रीम फास्ट चार्जिंग बॅटरी तंत्रज्ञान भारतात आणण्याची योजना आखत असल्याचे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही आमच्या ग्राहकांना एक स्पष्ट टेक्नोलॉजी रोडमॅप देखील सादर करत आहोत. जे एका दशकात केवळ 2 मिनिटांच्या चार्जमध्ये 100 मैलांची रेंज देण्याइतपक विस्तारित होईल असे त्यांनी सांगितलं.
हेही वाचा: 15 हजारांत बेस्ट स्मार्टफोन; मिळेल 50MP कॅमेरा अन् 5000mAh बॅटरी
Web Title: Ola Electric Invests In Israeli Battery Technology Firm Storedot Use Extreme Fast Charging Tech
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..