Electric Scooter : ओलाने लॉन्च केली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; काय आहेत फीचर्स?

स्कूटरमध्ये ओलाची नवीन ऑपरेटिंग सिस्टीम 3 (os3) असणार आहे. अगोदारच्या ओलाच्या स्कूटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम 2 होती.
OLA offer
OLA offerSakal

ओलाने दिवाळीमध्ये S1 चे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. S1 च्या नवीन मॉडेलची किंमत 84,999 रुपये ठेवली आहे. २४ ऑक्टोबर पर्यंत बुक केल्यास या गाडीची किंमत 79,999 रुपये असेल. पण या गाडीची डिलिवरी  पुढच्या महिन्यात एप्रिल पासून होणार आहे.   

ओलाचे CEO भाविश अग्रवाल यांनी स्कूटरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सांगितले की, 15 मिनिटात 50 % पर्यंत स्कूटर चार्ज होणार आहे. या व्यतिरिक्त या स्कूटर मध्ये नवीन फिचर्स असणार आहेत. या स्कूटरमध्ये ओलाची नवीन ऑपरेटिंग सिस्टीम 3 (os3) असणार आहे. अगोदारच्या ओलाच्या स्कूटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम 2 होती.  

कंपनीने सांगितले की, स्कूटर पूर्ण चार्ज झाल्यानंतर 101 किलोमीटर पर्यंत चालेल. त्यासोबत या स्कूटरची टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रती तास आहे. स्कूटर 0 ते 40 किमीचा वेग 4.3 सेकंदात पकडेल.

OLA offer
IND vs PAK T20 Live: अर्शदीपने पहिल्याच चेंडूवर केली बाबर आझमची शिकार

 2024 ला ओला लॉन्च करणार इलेक्ट्रिक कार

ओलाने स्वातंत्र्य दिनानिमित्त नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार असल्याचे सांगितले होते. कंपनीचे CEO भाविश अग्रवाल यांनी सांगितले होते की, एकदा चार्ज केल्यानंतर 500 किलोमीटर पर्यंत गाडीचालणार. त्यासोबत 4 सेकंदात 100 किलोमीटर प्रती तास वेगाने गाडी पळणार आहे. ही नवीन इलेक्ट्रिक कार 2024 पर्यंत बाजारात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com