Ola Electric Scooter ने केली सगळ्यांची सुट्टी, गेल्या महिन्यात विक्रीत टॉप, वाचा जबरदस्त फिचर l ola electric scooter is on top in sales competing tvs, hero know strong feature attracting customers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ola Electric Scooter

Ola Electric Scooter ने केली सगळ्यांची सुट्टी, गेल्या महिन्यात विक्रीत टॉप, वाचा जबरदस्त फिचर

Ola Electric Scooter : ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या नव्या मॉडेलने बाजारात चांगलाच धुमाकूळ घातलाय. ग्राहकांना ओलाच्या या बाईकचे इतके आकर्षण आहे की गेल्या महिन्यात कंपनीने तब्बल २१ हजारांहून अधिक ओला बाईक्सची विक्री करत ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. या कंपनीच्या विक्रीने स्पर्धेतील इतर इलेक्ट्रिक बाईक्सची सुट्टी केली आहे.

मागल्या महिन्याच्या सेल्स रिपोर्टनुसार ओला इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीच्या बाबतीत अग्रेसर आहे. कंपनीने टीव्हीएस, ऐथर, एम्पियर, हीरो इलेक्ट्रिक आणि ओकिनावा या कंपन्यांना स्पर्धेत मागे टाकले आहे. या स्कूटरची सुरुवाती किंमत 84,999 रुपये आहे. Ola S1 सीरीजमधील इलेक्ट्रिक स्कूटर लूक आणि फीचर्स तसेच रेंजच्या बाबतीत उत्तम आहे आणि त्यामुळे ग्राहकांमधे या स्कूटरची सर्वाधिक मागणी दिसून येते.

तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असाल तर सेल्स रिपोर्टनुसार सर्वाधिक विक्री कोणत्या स्कूटर्सची होतेय यावरून कुठली स्कूटर खरेदी करण्यासाठी बेस्ट आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता. चला तर कोणती स्कूटर विक्रीत कोणत्या क्रमांकावर आहे जाणून घेऊया. (Automobile)

मार्च 2023 च्या सेल्स रिपोर्टनुसार ओला इलेक्ट्रिक स्कूटरने गेल्या महिन्यात 21,273 स्कूटर्स विकल्यात. महिन्याभराच्या विक्रीसोबतच वर्षाच्या विक्रीकडेही कंपनीचा अग्रस्थानी कल दिसून येईल. दुसऱ्या क्रमांकावर आहे टीव्हीएस कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर. या कंपनीने मागल्या महिन्यात 16,768 इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केलीय. टीव्हीएस आयक्यूबच्या विक्रीतरही चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते. तर तिसऱ्या क्रमांकावर आहे एथर एनर्जी. या कंपनीने मागल्या महिन्यात 12,076 इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली.