ओलाचा धुमधडाका! अवघ्या ३० दिवसात केली तब्बल २० हजार स्कूटर्सची विक्री | Ola Electric | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ola

Ola Electric: ओलाचा धुमधडाका! अवघ्या ३० दिवसात केली तब्बल २० हजार इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री

Ola Electric Scooters: इलेक्ट्रिक दुचाकीची निर्मिती करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ओलाच्या वाहनांना ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ओलाने नोव्हेंबर महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. कंपनीने अवघ्या ३० दिवसात २० हजारांपेक्षा अधिक यूनिट्सची विक्री केली आहे. ऑक्टोबरप्रमाणेच नोव्हेंबर महिन्यात देखील कंपनीच्या वाहनांची मागणी कायम आहे.

सणांच्या काळात ऑक्टोबर महिन्यात कंपनीने चांगली कामगिरी केली होती. ऑक्टोबर महिन्यात कंपनीने २० हजारांपेक्षा जास्त यूनिट्सची विक्री केली आहे.

हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी वाहनाच्या विक्रीबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, नोव्हेंबर महिन्यात २० हजार वाहनांची विक्री केली. ग्राहकांचे खूप खूप आभार. जून २०२१ मध्ये १४०० ईव्ही ते आज बाजारातील ९० टक्के हिस्सा, प्रीमियम स्कूटर सेगमेंटमधील #EndIceAge पूर्ण झाले. २०२५ पर्यंत दुचाकी वाहनांच्या सेगमेंटमध्ये १०० टक्के ईव्ही असेल.

हेही वाचा: Government Sites: शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत... खूपच उपयोगी येतील 'या' ३ सरकारी वेबसाइट्स

कंपनीच्या या स्कूटर्सला तुफान प्रतिसाद

ओला इलेक्ट्रिक सध्या तीन स्कूटर्सची भारतीय बाजारात विक्री करत आहे. यामध्ये एस वन, एस वन एअर आणि एस वन प्रो चा समावेश आहे. दिवाळीच्याआधी कंपनीने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर एस वन एअरला ८४,९९९ रुपये किंमतीत लाँच केले होते. कंपनीनुसार, ओला एस वन एअरचे बुकिंग २०२३ मध्ये सुरू होईल. तर डिलिव्हरी एप्रिल २०२३ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

ओला एस वन स्कूटरची देखील विक्री करते. या स्कूटरची एक्स-शोरुम किंमत ९९,९९९ रुपये आहे. ओलाची सर्वात महागडी स्कूटर एसवन प्रो आहे. याची एक्स-शोरुम किंमत १,२९,९९९ रुपये आहे. तसेच, पुढील वर्षी होळीपर्यंत इलेक्ट्रिक बाईक लाँच करण्याचा देखील कंपनीचा मानस आहे.