
Omar M. Yaghi wins Nobel Prize in Chemistry for metal-organic frameworks
esakal
Omar Yaghi Nobel Prize 2025 : जॉर्डनमधील अम्मान येथे एका गरीब पॅलेस्टिनी रिफ्यूजी कुटुंबात जन्मलेल्या ओमर एम. यागी यांनी अशक्य वाटणारे स्वप्न सत्यात उतरवले. १९६५ मध्ये एका छोट्या खोलीत प्राण्यांसोबत राहणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
घरात वीज नव्हती, पाण्याची सोय नव्हती आणि पालकांना लिहिता-वाचता येत नव्हते. पण या प्रतिकूल परिस्थितीतही ओमरच्या मनात विज्ञानाची ज्योत पेटली. वयाच्या १०व्या वर्षी शाळेच्या ग्रंथालयात त्यांनी अणु रचनेचे चित्र पाहिले आणि विज्ञानावर त्यांचे प्रेम जडले.