One Plus 7 : आज होणार लाँच, उत्सुकता शिगेला!

मंगळवार, 14 मे 2019

अल्पावधितच मोठ्या प्रमाणात सर्वांच्या पसंतीस पडलेल्या 'वन प्लस' या मोबाईल कंपनीची 'वन प्लस 7' ही सिरीज आज (ता. 14) लाँच होणार आहे. बंगळुर इंटरनॅशन एक्सिबिशन सेंटर येथे या सिरीजचे अनावरण होईल. 

बंगळुरू : अल्पावधितच मोठ्या प्रमाणात सर्वांच्या पसंतीस पडलेल्या 'वन प्लस' या मोबाईल कंपनीची 'वन प्लस 7' ही सिरीज आज (ता. 14) लाँच होणार आहे. बंगळुर इंटरनॅशन एक्सिबिशन सेंटर येथे या सिरीजचे अनावरण होईल. 

सिरीज लॉन्चिंगचा हा कार्यक्रम जागतिक पातळीवर होत आहे. त्यामुळे भारतासह अमेरिका व युरोपमध्येही आज 'वन प्लस 7' सिरीज लाँच होईल. टेकसॅव्ही आणि स्मार्टफोन प्रेमींसाठी 'वन प्लस 7 सिरीज' ही आनंदाची पर्वणीच म्हणता येईल. 

एका वेळी 2 स्मार्टफोनचे लॉन्च 
वन प्लसच्या इतिहासात पहिल्यांदाच कंपनी आपले 2 तगडे आणि एका पेक्षा एक वरचढ असे स्मार्टफोन्स लॉन्च करत आहे. 'वन प्लस 7' आणि 'वन प्लस 7 प्रो' अशी या मॉडेल्सची नावं असून ती एकाच वेळी बाजारात येतील. दोन्ही मोबाईलची वैशिष्ट्ये, किंमती, स्पेसिफिक्शन्स वेगवेगळी असतील. 

वन प्लसबद्दल...
वन प्लस ही स्मार्टफोनची सिरीज कमी वेळातच लोकप्रिय ठरली. ही कंपनी चीन येथील असून जगभरात तिचे चाहते आहेत. 2013 च्या डिसेंबरमध्ये पिट लाउ आणि कार्ल पी या दोघांनी मिळून सुरु केलेल्या वन प्लस काही वर्षातच मोठ्या प्रमाणात चाहते लाभले आहेत.

सोशल मीडियावर काही दिवसांपासून 'वन प्लस 7' बद्दल उत्सुकता आहे.  #OnePlus7SeriesLaunch हा हॅशटॅग गेल्या काही दिवसांपासून ट्रेंडिंग आहे. तर, गेल्या एक दीड महिन्यापासून या स्मार्टफोनचे बुकिंग सुरु झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One plus 7 and one plus 7 pro launches today