लॉंच आधीच OnePlus 10 Pro चे फीचर्स लीक, मिळणार दमदार कॅमेरा-प्रोसेसर

OnePlus 10 Pro
OnePlus 10 Pro

OnePlus 10 Pro Launch : OnePlus चा स्मार्टफोन OnePlus 10 Pro च्या लॉन्चची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत, दरम्यान कंपनीने या स्मार्टफोनच्या लॉंचची डेट कंफर्म झाली असून त्यानुसार हा फोन 4 जानेवारीला म्हणजेच उद्या लाँच केला जाईल. सध्यातरी ही चिनी बाजारात लॉंच संबंधी ही माहिती असून तिकडे लॉन्च झाल्यानंतर त्याची जागतिक लॉन्चिंग डेट उघड होईल.

लॉन्चपूर्वी टिपस्टर इशान अग्रवालने ट्विटर अकाउंटवर फोनच्या काही खास फीचर्सविषयी माहिती दिली आहे. याशिवाय OnePlus ने त्याच्या काही स्पेसिफिकेशन्सबद्दल देखील सांगितले आहे.

कंपनीने म्हटले आहे की फोनमध्ये LTPO 2.0 डिस्प्ले दिला जाईल, तसेच याला Snapdragon Gen 1 चिपसेट देखील दिला जाईल. अद्याप कंपनी OnePlus 10 Pro सह रेग्युलर OnePlus 10 सादर करेल की नाही हे अद्याप माहित नाही. टिपस्टरनुसार, प्रो मॉडेलमध्ये 6.7-इंचाची स्क्रीन असेल, जी 120Hz रिफ्रेश रेट आणि क्वाड एचडी + रिझोल्यूशनसह येईल.

फोनबद्दल पूर्वीचे रिपोर्ट्स आले होते की यात 5,000mAh ची बॅटरी दिली जाईल, ज्यामध्ये 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग मिळेल, जी OnePlus साठी एक नवीन गोष्ट असेल. तसेच OnePlus 10 Pro ला Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट मिळेल परंतु तो LPDDR5 टेक्नोलॉजी + UFS 3.1 स्टोरेजसह पेयर केला जाईल.

OnePlus 10 Pro
Jio चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 400 पेक्षा कमीत 84 दिवस व्हॅलिडिटी

कॅमेरा

या फोनमध्ये तुम्हाला सेकंड जनरेशन हॅसलब्लॅड कॅमेरा फोनच्या मागील बाजूस दिला जाईल. फोनमध्ये रियर 48 मेगापिक्सेल कॅमेरा, 50 मेगापिक्सलचा सेंकंडरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल स्नॅपर उपलब्ध असेल. सध्या प्रत्येक कॅमेऱ्याचे फंक्सनबद्दल माहिती नाही. फोनच्या फ्रंटला 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

OnePlus 10 Pro फोन 8.55mm जाड असेल, तुलनेने या फोनची जाडी ही OnePlus 9 Pro पेक्षा थोडी कमी असणार आहे, तसेच जर अफवांवर विश्वास ठेवायचा झाला तर, हा फोन काही Android फ्लॅगशिप फोन जसे की Galaxy S21 Ultra (8.9mm) पेक्षा देखील पातळ असेल. सध्या तरी टिपस्टरने फोनच्या किंमतीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

OnePlus 10 Pro
सैन्यात नोकरी म्हणून बापाकडून गावजेवण; मुलाचा वडिल अन् पत्नीलाही गंडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com