कसा आहे OnePlus 6 स्मार्टफोन? 

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

मुंबई: वनप्लसचा बहुप्रतिक्षित OnePlus 6 स्मार्टफोन आज (गुरुवार) भारतात सादर करण्यात आला. भारतात लॉन्च करण्याआधी काल लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कंपनीने हा फोन सादर केला. 

मुंबई: वनप्लसचा बहुप्रतिक्षित OnePlus 6 स्मार्टफोन आज (गुरुवार) भारतात सादर करण्यात आला. भारतात लॉन्च करण्याआधी काल लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कंपनीने हा फोन सादर केला. 

महागडा असलेल्या हा स्मार्टफोन अमेरिकी बाजारात तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध करण्यात आला असून 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 529 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयात 35,800 रुपये आहे. तर 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 579 डॉलर म्हणजेच 39,200 रुपये आहे तर 8 जीबी रॅम 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 629 डॉलर म्हणजेच जवळपास 42 हजार 600 रुपये आहे. हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक, मिरर ब्लॅक आणि सिल्क व्हाइट लिमिटेड एडिशन या रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला असून येत्या 21 मे पासून या फोनचा ओपन सेल सुरू होणार आहे. भारतात अॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी हा फोन 21 मे पासून उपलब्ध असेल.

वनप्लस 6ची वैशिष्ट्ये: 

वनप्लस 6 मध्ये आयफोनएक्सप्रमाणे नॉच डिस्प्ले दिला आहे. शिवाय फ्रंट कॅमेरा, इअरपीस आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देण्यात आले आहे. जुन्या OnePlus प्रमाणे या फोनमध्येही क्वालकॉमचे सर्वात पावरफुल प्रोसेसर स्नॅपड्रॅगन देण्यात आले आहे.

-6.28 इंचाची स्क्रीन

-कॅमेरा मध्ये देण्यात आला आहे 

-मेटल ऐवजी ग्लास वापरण्यात आला आहे

-मिरर ब्लॅक, मिडनाइट ब्लॅक, लिमिटेड एडिशन सिल्क व्हाईट कलर

-फक्त अर्धा तास चार्ज केल्यावर दिवसभर चालणार

-0.4 सेकंदात फेस अनलॉक

ऑक्सिजन ओएस

गेमिंग मोड फास्ट गेम लॉन्च 

फास्ट अँड स्मूथ

स्पेसिफिकेशन –

प्रोसेसर : 2.8GHz octa-core

 फ्रंट कॅमेरा:16-megapixel

रिअ रकॅमेरा : 16-megapixel

रिझोल्युशन  :1080×2280 pixels

ओएस : Android 8.1 Oreo

बॅटरी क्षमता : 3300mAh

वनप्लस डॉट कॉमवरून फोन विकत घेतल्यास बुलेट वायरलेस इअरफोन फ्री मिळणार आहेत. 

वन प्लस बुलेट वायरलेस इअरफोनची  वैशिष्ट्ये

-मॅग्नेटिक कंट्रोल

-एकत्र ठेवले की इअरफोन बंद होतात आणि वेगळे केले की सुरू होतात

-फोन घेण्यासाठी फक्त इअरफोन वेगळे करावे लागणार

-फास्ट चार्जिंग

-10 मिनिटे चार्ज केला तरी 5 तास चालणार

-किंमत 69 डॉलर 

वन प्लस बुलेट वायरलेस इअरफोन 5 जूनपासून उपलब्ध होणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: OnePlus 6 launched: Price, specifications and other features