OnePlus 7 चं नवीन व्हेरिअंट तुम्ही पाहिलं का? बघाच

टीम ईसकाळ
मंगळवार, 9 जुलै 2019

मुंबई: बहुचर्चित वनप्लस 7 नुकताच मे महिन्यात लाँच झाला असून भारतात 4 जूनपासून उपलब्ध झाला आहे. मिरर ग्रे कलरमध्ये उपलब्ध असलेला OnePlus 7 आता ‘मिरर ब्ल्यू कलर’ उपलब्ध होणार आहे. येत्या 15 जुलैपासून अॅमेझॉन प्राईम डे सेल (www.amazon.in) सुरु होणार असून हे नवीन व्हेरिअंट त्यावरून खरेदी करता येईल. अॅमेझॉन आणि वनप्लसच्या अधिकृतवेबसाईटवरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. 

OnePlus 7 कसा आहे?

 6 जीबी रॅम असलेला व्हेरिअंट मिरर ग्रे कलरमध्ये, 8GB रॅम व्हेरिअंट रेड आणि मिरर ग्रे कलरमध्ये उपलब्ध होता. आता कंपनीने यातील 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज क्षमता असलेले व्हेरिअंट नवीन ‘मिरर ब्ल्यू कलर’मध्ये देखील उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये मागील बाजूला ट्रिपलऐवजी ड्युअल कॅमेऱ्याचा सेटअप(48 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल)असून सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर 3 हजार 700 मिलिअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच वॉटरड्रॉप नॉच 6.41 इंचाचा फुल एचडी प्लस ऑप्टीक एमोल्ड डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास 6 आणि अॅण्ड्राइड 9 पाय बेस्ड ऑक्सिजन ओएसवर असणारे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर आहे. 

 किंमत: 
-वनप्लस 7 च्या मिरर ब्ल्यू व्हेरिअंटची किंमत 32 हजार 999 रुपये आहे. 
- वनप्लस 7 च्या 8GB RAM आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 37 हजार 999 रुपये इतकी आहे.
-अॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये एचडीएफसी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास ग्राहकांना 1,750 रुपये कॅशबॅक मिळणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: OnePlus 7 new variant launched in India, priced at ₹32999