OnePlus Nord Watch : येतेय वनप्लसची परवडणारी स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OnePlus Nord Watch : येतेय वनप्लसची परवडणारी स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत

OnePlus Nord Watch : येतेय वनप्लसची परवडणारी स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत

टेक कंपनी OnePlus ने लवकरच बजेट सेगमेंटमध्ये एंट्री करणार असून वापरकर्त्यांना OnePlus Nord Watch ही 5,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीने म्हटले आहे की नॉर्ड कॅटेगरीमधील ही पहिली स्मार्टवॉच असेल, तसेच कंपनीने या संबंधित काही फीचर्सची देखील माहिती दिली आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'कमिंग सून' पोस्टर शेअर केले आहे.

OnePlus Nord वॉचची किंमत किती असेल?

नवीन OnePlus Nord स्मार्टवॉचची किंमत सुमारे 5,000 रुपये असू शकते असे एका रिपोर्टमध्ये समोर आले आहे. तसेच, हे स्मार्टवॉच ब्लॅक आणि व्हाइट कलर पर्यायांमध्ये लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कंपनीने OnePlus Watch लाँच केली होती, जी भारतीय बाजारपेठेत 16,999 रुपयांना खरेदी करता येईल.

लीक रिपोर्टनुसार, OnePlus Nord Watch चे दोन व्हेरिएंट लॉन्च केले जाऊ शकतात, ज्यापैकी एक गोल असेल आणि दुसरा स्क्वेअर डायल असेल. गोलाकार डायलमध्ये 240x240 पिक्सेल आणि 390x390 पिक्सेल रिझोल्यूशनसह डिस्प्ले दिले जाऊ शकते. त्याचप्रमाणे, स्क्वेअर डायलमध्ये 240x280 पिक्सेल आणि 368x448 पिक्सेल रिझोल्यूशन मिळू शकते.

हेही वाचा: लिक झालेला MMS पॉर्न वेबसाइटवरून कसा काढाल? येथे जाणून घ्या पध्दत

हे नवीन वनप्लस नॉर्ड वॉचचे डिझाइन असेल

राउंड डायल घड्याळ प्रोटेक्टिव्ह किनारी व्यतिरिक्त मिनिट आणि तासांसाठी डॅश लाइन दिली जाऊ शकते. वॉचचे रग्ड व्हर्जन दोन रोटेटींग क्राऊन्ससह येऊ शकते. त्याच वेळी, चौरस डायल असलेल्या वॉचच्या उजव्या बाजूला दोन बटणे आढळू शकतात. स्क्वेअर डायलसह वनप्लस नॉर्ड वॉच मोठ्या डिस्प्लेसह येण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा: सोशल मिडीयावर चर्चेत असलेल्या 'त्या' डुप्लिकेट एकनाथ शिंदेंवर पुण्यात गुन्हा

Web Title: Oneplus Affordable Smartwatch Oneplus Nord Watch Is Coming Know Expected Price

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :OnePlus