OnePlus Phone | वनप्लसचा नवीन फोन या दिवशी होणार लॉन्च; आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OnePlus Phone

OnePlus Phone : वनप्लसचा नवीन फोन या दिवशी होणार लॉन्च; आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार

मुंबई : स्मार्टफोन ब्रँड वनप्लस लवकरच आपला नवीन फोन बाजारात आणणार आहे. हा फोन मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2023) मध्ये सादर केला जाऊ शकतो.

या वर्षी २७ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत बार्सिलोना स्पेनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. कंपनीने अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

हा फोन वनप्लस कॉन्सेप्ट टू नावाने सादर केला जाईल असे सांगितले जात आहे. या वर्षीचा OnePlus चा मेगा इव्हेंट, OnePlus Cloud 11 पुढील महिन्यात ७ फेब्रुवारीला होणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी OnePlus 11 5G लॉन्च करणार आहे.

हेही वाचा: Aadhaar PAN : एखादी व्यक्ती वारल्यानंतर तिच्या पॅन आणि आधार कार्डचे काय कराल ?

OnePlus Concept Two फोन मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2023 मध्ये सादर केला जाईल. मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2023 जवळजवळ एक महिना दूर आहे. यात #OnePlusConceptTwo" सादर केला जाईल.

कंपनीने अद्याप फोनबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. कंपनी फोनसोबत नवीन तंत्रज्ञान सादर करू शकते. हा फोन OnePlus Concept One चे नवीन जनरेशन मॉडेल असेल, जो 2020 मध्ये सादर करण्यात आला होता.

वनप्लस कन्सेप्ट वन

OnePlus ने Las Vegas मधील CES 2020 कार्यक्रमात विशेष तंत्रज्ञानासह Concept One स्मार्टफोनची McLaren आवृत्ती सादर केली. या उपकरणासाठी कंपनीने ऑटोमोबाईल कंपनी मॅक्लारेनसोबतही भागीदारी केली आहे.

या फोनची खासियत म्हणजे याचा बॅक पॅनल इलेक्ट्रॉनिक आहे. याचा अर्थ असा की कॉन्सेप्ट वनचा मागील कॅमेरा फोटो क्लिक केल्यानंतर आपोआपच हाइड होतो. हे तंत्रज्ञान कॅमेरा लपवण्यासाठी फक्त 0.7 सेकंद घेते.

हेही वाचा: LIC Job : एलआयसीमध्ये ९ हजार जागांसाठी भरती; आजच करा अर्ज

वनप्लस क्लाउड 11

OnePlus 7 फेब्रुवारी 2023 रोजी त्याच्या OnePlus Cloud 11 इव्हेंटमध्ये नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन मालिका लॉन्च करणार आहे. या इव्हेंटमध्ये OnePlus 11 5G लाँच केला जाईल.

OnePlus 11 5G ही OnePlus 10 ची अपग्रेड केलेली आवृत्ती असणार आहे. लॉन्च होण्यापूर्वीच फोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती समोर आली आहे. OnePlus 11 5G ला 6.7-इंच वक्राकार AMOLED डिस्प्ले मिळेल.

नवीन Android प्रोसेसर Snapdragon 8 Gen 2 आणि 16 GB पर्यंत RAM असलेल्या फोनमध्ये 512 GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते.

फोनसोबत 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा उपलब्ध असेल, जो Sony IMX890 सेन्सरसह येईल. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आणि 100 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

टॅग्स :TechnologyphoneOnePlus