OnePlus चा पहिला फोल्डेबल फोन बाजारात, OnePlus Open ची क्रेझ वाढली

OnePlus Open हा कंपनीचा पहिला फोल्डेबल फोन आहे
OnePlus mobile
OnePlus mobileesakal

OnePlus mobile : OnePlus ही कंपनी भारतात तसेच जगभरात आपल्या स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध आहे. सध्या वन प्लस कंपनी नवनवीन फोल्डेबल फोन लॉन्च करण्यासाठी सज्ज झालीय. कंपनीचा नवा स्मार्टफोन 19 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल.

OnePlus Open हा कंपनीचा पहिला फोल्डेबल फोन आहे, ज्याची अधिकृत लॉन्च तारीख जाहीर झाली आहे. हा फोन भारतात १९ ऑक्टोबरला म्हणजेच पुढच्या आठवड्यात लॉन्च होणार आहे. सध्या सॅमसंग फोल्डेबल फोन मार्केटमध्ये वर्चस्व गाजवत आहे. पण आता वनप्लस स्पर्धेत उतरला आहे.

वनप्लस ओपन वजनाने हलका असेल

लॉन्चच्या काही वेळापूर्वी, प्रख्यात टेक कंपनीने यावर जोर दिला होता की संबंधित फोन वजनाने हलका असेल. आणि याचं डिजाइन ग्राहकांना फोन वापरताना उत्तम अनुभव देईल.OnePlus चा फोल्डेबल फोन हलका असून तो स्लिम असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. याशिवाय वनप्लस ओपनमध्ये स्क्रीन क्रीजवर कोणतीही रेषा दिसणार नाही.

OnePlus mobile
Health Tips: आरोग्याच्या समस्या झटक्यात होतील दूर म्हणून Weight Loss आहे गरजेचा...

त्याचा कॅमेरा परफॉर्मन्सही चांगला असल्याचं म्हटलं जात आहे. कंपनीने दावा केला आहे की, ग्राहकांना अप्रतिम अनुभव देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सध्याच्या फोल्डेबल स्मार्टफोन्स मार्केट मध्ये स्पर्धा वाढवली आहे. ऑल राऊंडर स्मार्टफोन बनवण्यासाठी कंपनीने बाजारात अन्य ब्रँड्सला टक्कर दिली आहे.

OnePlus mobile
World Mental Health Day : जेवढा प्रवास तेवढे मानसिक आरोग्य राहणार खास! काय आहेत फायदे ? घ्या जाणून

OnePlus Open ची भारतात किंमत

अनेक ऑनलाइन रिपोर्ट्समध्ये माहिती मिळाली आहे की OnePlus Open ची किंमत $1,699 म्हणजेच जवळपास 1,41,490 रुपये असू शकते. मात्र, वनप्लस आपल्या पहिल्या फोल्डेबल फोनची किंमत कशी ठरवणार हे पाहणे बाकी आहे.

OnePlus mobile
Foods for Liver Health : हळद, कॉफीसह ‘या’ २ गोष्टींचा आहारात करा समावेश; यकृत राहील निरोगी

OnePlus Open चे स्पेसिफिकेशन

या डिवाइसचे अनेक फीचर्स समोर आले आहेत. OnePlus च्या या फोल्डेबल फोनमध्ये 7.8 इंचाची मोठी स्क्रीन मिळेल. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. त्याचा बाहेरील डिस्प्ले 6.3 इंचाचा असेल.

OnePlus mobile
Health Tips पपई खाण्याचे Side Effects तुम्हाला ठाऊक आहेत का? आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकतं पपईचं सेवन

या मॉडेलमध्ये Qualcomm चा फ्लॅगशिप Snapdragon 8 Gen 2 चीपसेट असलेला प्रोसेसर आहे. जो 18 GB रॅम आणि 512 GB इंटरनल स्टोरेजसह पेअर केला जाऊ शकतो. कंपनीने शेअर केलेल्या टीझरमध्ये एक अलर्ट स्लाइडर असेल. याशिवाय, फोल्डेबल फोन गॅपलेस डिझाइनसह येऊ शकतो. जो वनप्लस आणि ओप्पो या दोघांनी विकसित केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com