Oneplus AI : वनप्लसमध्ये येतंय एक भन्नाट एआय फिचर, मिटिंग्सचं रेकॉर्डिंग करणार अन्... जाणून घ्या

AI Features : वनप्लस युजर्ससाठी एक अगदी वेगळे आणि उपयुक्त वैशिष्ट्य घेऊन येत आहे.
OnePlus' AI Voice Summariser
OnePlus AI Voice Summariseresakal

AI Recorder : वनप्लस लवकरच त्यांच्या वापरकर्त्यांसाठी एक अगदी वेगळे आणि उपयुक्त फीचर घेऊन येत आहे. कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून आवाज रेकॉर्डिंग Summary (सारांश) तयार करणारे एक वैशिष्ट्य विकसित करत आहे. याचा अर्थ असा आहे की, आता तुम्ही तुमच्या फोनवर केलेल्या एखाद्या मोठ्या मीटिंगचा किंवा लेक्चरचा आवाज रेकॉर्डिंग करू शकता आणि नंतर त्या संपूर्ण रेकॉर्डिंग ऐवजी फक्त महत्वाचे मुद्दे (सारांश) वाचू शकता.

हे फीचर अद्याप विकासाच्या स्थितीत आहे पण काही रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. या वैशिष्ट्याद्वारे तुम्ही तुमच्या आवाज रेकॉर्डिंगचे MP3, AMR, AWB, AAC आणि WAV अशा विविध फॉरमॅटमध्ये सारांश तयार करू शकता. त्याचबरोबर ही रेकॉर्डिंग 500MB पेक्षा कमी आकाराची आणि 5 तासांपेक्षा कमी वेळाच असावी लागणार आहे. अतिशय कमी वेळाच्या रेकॉर्डिंगसाठी सारांश तयार करता येणार नाही.

OnePlus' AI Voice Summariser
Honda Amaze : लवकरच तुमच्या भेटीला येतीये होंडाची 'अमेज़' ; नव्या जनरेशनसह कमालीचे सुरक्षा फीचर्स,जाणून घ्या

याशिवाय, एका वेळी किती सारांश तयार करायचे यावर मर्यादा असणार आहे. तसेच एका दिवसात किती सारांश तयार करता येतील यावरही मर्यादा असेल. या मर्यादेमुळे कदाचित हा फीचर सर्व्हरवरवर अवलंबून असेल किंवा सबस्क्रिप्शनवर आधारित असू शकेल.

OnePlus' AI Voice Summariser
Call History : क्षणात मिळवा कुणाचीही कॉल हिस्ट्री! जिओ अन् एअरटेलने आणलं नवीन फिचर,कसं वापरायचं जाणून घ्या

याशिवाय, या वैशिष्ट्या आधी कोणत्या देशात लाँच होणार याबाबत काही माहिती मिळाली नाहीये. या फीचरमध्ये चायनीज, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषा असल्याचा उल्लेख आढळला आहे. याचा अर्थ असा होतो की, हे फीचर सर्वप्रथम चीन, भारत आणि अमेरिकेत लाँच होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com