OnePlus Nord CE 3 Lite : 'या' तारखेला येतोय वनप्लसचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! जाणून घ्या काय असेल खास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

oneplus nord ce 3 lite may launch 4 april 2023 check all details leak

OnePlus Nord CE 3 Lite : 'या' तारखेला येतोय वनप्लसचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! जाणून घ्या काय असेल खास

वनप्लस आपल्या नॉर्ड सीरिजमध्ये काही नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मिड-रेंज लाइनअपमध्ये, चीनी कंपनी OnePlus Nord 3, Nord CE 3 आणि OnePus Nord CE 3 Lite स्मार्टफोन लॉन्च करू शकते. आता OnePlus Nord CE 3 Lite बाबत नवीन माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार OnePlus पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल 2023 मध्ये लाइट व्हेरिएंट लॉन्च करू शकते.

टिपस्टर Max Jambor नुसार, OnePlus Nord CE 3 Lite स्मार्टफोन 4 एप्रिल रोजी लॉन्च होईल. सध्या, दुसऱ्या व्हेरियंटचे लॉन्च डिटेल्स समोर आलेले नाहीयेत. पण नॉर्ड सीरिजचे तिन्ही फोन एकाच वेळी सादर केले जातील अशी अपेक्षा आहे.

OnePlus Nord CE 3 Lite चे फीचर्स

OnePlus Nord 3 Lite च्या फीचर्सबद्दल माहिती अजून समोर आलेली नाही. इतर दोन व्हेरिएंट्सपेक्षा Nord CE 3 Lite नक्कीच वेगळा असणार आहे. आगामी OnePlus फोनबद्दल अधिक माहिती पुढील तीन आठवड्यांत समोर येणे अपेक्षित आहे. मात्र, लाइट व्हर्जन असल्यामुळे, या फोनला OnePlus Nord CE 3 पेक्षा कमी पावरफुल स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात.

लीकनुसार, OnePlus Nord 3 स्मार्टफोन कंपनीच्या OnePlus Ace 2V चे रीब्रँडेड व्हर्जन असेल. डिव्हाइस MediaTek Dimensity 9000CPU सह लॉन्च केला जाईल. फोनला 120 Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.72 इंच AMOLED स्क्रीन मिळेल असे सांगितले जात आहे.

हा डिव्हाइस 50 मेगापिक्सेल प्रायमरी, 8 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आणि 2 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह लॉन्च केला जाईल. हँडसेटमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Nord CE 3 स्मार्टफोन OnePlus Ace 2V च्या फीचर्ससह लॉन्च केला जाईल. Qualcomm Snapdragon 782G चिपसेट Nord CE 3 मध्ये मिळेल

Nord 3 आणि CE 3 स्मार्टफोन समान फीचर्ससह येतात मात्र लाइट व्हेरियंट पूर्णपणे वेगळा असेल. OnePlus Nord CE 3 Lite वेगळ्या चिपसेट, स्क्रीन आणि मोठ्या बॅटरीसह लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :OnePlus