OnePlus चे पहिले वायर्ड इअरफोन येतायत 27 ऑगस्टला, जाणून घ्या फीचर्स-किंमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

oneplus nord wired earphones launch in india on 27 august check details price and feature

OnePlus चे पहिले वायर्ड इअरफोन येतायत 27 ऑगस्टला, जाणून घ्या फीचर्स-किंमत

OnePlus कंन्फर्म केले आहे की ते 27 ऑगस्ट रोजी भारतात त्यांचे नवीन वायर्ड इयरफोन लॉन्च करणार आहेत. Nord सीरीज अंतर्गत वनप्लसचा हा पहिला इयरफोन आहे. कंपनीने याआधी या सीरीजअंतर्गत Nord Buds आणि Nord Buds CE लाँच केले होते. कंपनीने शेअर केलेल्या टीझर इमेजवरून असे दिसून येते की इयरफोन इन-इअर डिझाइनसह येतील. OnePlus Nord वायर्ड इयरफोन आधीच युरोपमध्ये लॉन्च केले गेले आहेत.

OnePlus Nord वायर्ड इयरफोनमध्ये मॅग्नेज देण्यात आले आहेत जे एकत्र चिकटतात. मॅग्नेटिक इअरबड एकत्र क्लिप केल्यावर म्युझिज पॉज होते. चांगल्या आवाजासाठी, इयरफोन्समध्ये 9.2 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर युनिट आणि 0.42cc साउंड कॅवीटा देण्यात आली आहे. इयरफोन्समध्ये 3.5 मिमी ऑडिओ जॅक दिला आहे. हे वायर्ड इयरफोन Amazon.in आणि OnePlus.in वर ऑनलाइन उपलब्ध असतील.

किंमत किती असेल?

हे इयरफोन युरोपमध्ये €19.99 मध्ये विकले गेले होते, ज्याची किंमत अंदाजे रु 1,500 आहे कारण OnePlus चे आयटम भारतात युरोपीय देशांपेक्षा कमी महाग आहेत.

हेही वाचा: Jio चे दमदार रीचार्ज प्लॅन, फ्री ओटीटी सबस्क्रिप्शन मिळेल 150GB डेटा

OnePlus Nord Wired Earphonesचे फीचर्स

OnePlus Nord वायर्ड इअरफोन्स आणि OnePlus बुलेट्स वायरलेस Z नेकबँड इअरफोन्सचे डिझाईन खूप मिळते आहे. यामध्ये 0.42cc साउंड कॅवीटी आणि 9.2mm डायनॅमिक ड्रायव्हर्सचा समावेश आहे. नॉर्ड वायर्ड इयरफोन IPX4 सह येतील म्हणजेच ते घाम आणि इतर स्प्लॅटरचा सामना करू शकतात. इन-लाइन मायक्रोफोन हे नॉर्ड वायर्ड इयरफोनचे कंट्रोल पॅनल आहे. टच कंट्रोल्स पॉवर, व्हॉल्यूम अप किंवा व्हॉल्यूम डाउन बटणांवर क्लिक करणे सोपे जाते. हे 3.5 मिमी ऑडिओ कनेक्टरसह कोणत्याही गॅझेटसह वापरता येतील.

हेही वाचा: विधानभवन सभागृहात लवकरच लागणार बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र

Web Title: Oneplus Nord Wired Earphones Launch In India On 27 August Check Details Price And Feature

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :OnePlus