Balasaheb Thackeray | विधानभवन सभागृहात लवकरच लागणार बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde demand Shiv Sena chief Balasaheb Thackeray picture in  new Parliament building

विधानभवन सभागृहात लवकरच लागणार बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर घडले आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले, यानंतर खरी शिवसेना कोणाची यावरून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरू आहे. या राजकीय सत्तासंघर्षादरम्यान विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र तीन महिन्यात लावण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला आहे. याबाबत उदय सामंत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात आता बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र झळकणार आहे. विधानसभेच्या पावसाळी आधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात याबद्दलची घोषणा करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरण्यावरून देखील उध्दव ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले होते. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्राद्वारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे याबद्दलची मागणी केली होती. त्यानंतर तीन महिन्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात येणार आहे. तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येईल अशा घोषणा आज विधानसभेत करण्यात आली. उदया सामंत यांनी त्यांच्या ट्विटमधून या बद्दलचे निवेदन पोस्ट केले आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! येत्या वर्षभरात होणार ७५ हजार रिक्त शासकीय पदांची भरती

उदय सामंत यांनी ट्विट केले की, "विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र तीन महिन्यात लावण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला. ह्या संदर्भातील मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती."

हेही वाचा: मंत्रिपद गेलं तरी मला फरक पडत नाही; नितीन गडकरींचा व्हिडीओ व्हायरल

Web Title: Balasaheb Thackeray Picture In Central Hall Of Vidhan Bhavan In Three Months Shivsena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..