Bumble Fake Account : ऑनलाईन डेटिंग होणार अधिक सुरक्षित! फेक, स्पॅम प्रोफाईल हटवण्यासाठी बम्बल घेतंय एआयची मदत..

Online Dating Safety : कित्येक डेटिंग अ‍ॅप्सवर मोठ्या प्रमाणात फेक आणि स्पॅम प्रोफाईल असल्यामुळे त्यांचा वापर करणं नकोसं वाटतं.
Bumble Fake Account
Bumble Fake AccounteSakal

Bumble uses AI to detect Fake Accounts : आजकाल तंत्रज्ञानामुळे नवीन मित्र-मैत्रीण शोधणं किंवा डेटिंग करणं सोपं झालं आहे. मात्र, कित्येक डेटिंग अ‍ॅप्सवर मोठ्या प्रमाणात फेक आणि स्पॅम प्रोफाईल असल्यामुळे त्यांचा वापर करणं नकोसं वाटतं. बम्बल या प्रसिद्ध डेटिंग अ‍ॅपने यावर उपाय शोधण्यासाठी एआयची मदत घेतली आहे. हा प्रयत्न मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. (Online Dating)

बम्बल कंपनीने सांगितलं, की त्यांनी डेटिंगला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी 'डिसेप्शन डिटेक्टर फीचर'चा (Deception Detector Feature) वापर केला. या फीचरच्या वापरानंतर 95 टक्के फेक, स्पॅम किंवा स्कॅम प्रोफाईल आपोआप ब्लॉक करण्यात आल्या. तसंच यानंतर एकूण स्पॅम आणि फेक अकाउंट्सच्या रिपोर्टमध्ये 45 टक्के घट झाल्याचंही दिसून आल्याचं कंपनीने स्पष्ट केलं. (Online Dating Scam)

डेटिंग अ‍ॅपवरील मुख्य समस्या

डेटिंग अ‍ॅप्स वापरताना यूजर्सना सर्वात जास्त भीती फेक प्रोफाईलकडून होणाऱ्या फसवणुकीची असते. बम्बलने घेतलेल्या सर्वेक्षणात सुमारे 46 टक्के यूजर्सनी याबाबत माहिती दिली आहे. आपल्याला मॅच झालेली व्यक्ती खरी आहे की फेक अकाउंट आहे हे ओळखता न येणं डेटिंग अ‍ॅप्सवरील मुख्य समस्या असल्याचं बम्बलने म्हटलं आहे. (Artificial Intelligence)

Bumble Fake Account
AI Dating Tools : परफेक्ट लाईफ पार्टनर शोधण्यासाठी पठ्ठ्याने ChatGPT ला लावलं कामाला; 5,000 मुलींशी चॅट करून घेतला निर्णय!

ऑनलाईन स्कॅममध्ये वाढ

टेक क्रंचने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, 2022 साली केवळ डेटिंग स्कॅममुळे झालेल्या फसवणुकीत 1.3 बिलियन डॉलर्सचं नुकसान झालं आहे. सरासरी एका व्यक्तीला 4,400 डॉलर्सचा फटका अशा स्कॅममध्ये बसला आहे. याबाबत बम्बलच्या सीईओ लिडियान जोन्स यांनीही चिंता व्यक्त केली आहे. (Safer Internet Day)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com