
नवीन कायदा रिअल मनी गेम्सवर बंदी घालून बेकायदेशीर बेटिंग अॅप्सवर कठोर कारवाई करतो.
ई-स्पोर्ट्सला उद्योग आणि सॉफ्ट पॉवर म्हणून प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीला चालना देतो.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गेमिंग क्षेत्रात संतुलित आणि धोरणात्मक बदल घडवले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या एप्रिलमध्ये देशातील प्रसिद्ध गेमर्सशी केलेली हलकी फुलकी चर्चा आता चर्चेचा विषय ठरली आहे. त्यावेळी ‘नवशिक्या’ हा शब्द वापरत त्यांनी विनोद केला पण त्यामागे ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला आकार देण्याचा गंभीर संदेश लपला होता. अलीकडेच संसदेने मंजूर केलेल्या नव्या कायद्याने रिअल मनी गेमिंगवर पूर्ण बंदी घालून ड्रीम11, एमपीएलसारख्या कंपन्यांना धक्का दिला आहे तर ई स्पोर्ट्सला उद्योग म्हणून प्रोत्साहन देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.