PAN Card बनवायचंय? या सोप्या स्टेप्ससह घरी बसूनच करा अप्लाय

सरकारने पॅनकार्ड ऑनलाइन करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे.
pan card
pan cardesakal
Summary

सरकारने पॅनकार्ड ऑनलाइन करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे.

Online PAN Card: सरकारने पॅनकार्ड (PAN Card) ऑनलाइन करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. फक्त १० मिनिटांत तुम्ही घरी बसून पॅन बनवू शकता. बँकेत खाते उघडणे असो किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरणे असो, या सर्व कामांमध्ये पॅनकार्ड हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. जर तुम्ही अद्याप पॅन कार्ड बनवले नसेल तर कोणत्याही रांगेचा कोणताही त्रास न घेता केवळ 10 मिनिटांत घरबसल्या ऑनलाईन पॅन कार्डसाठी तुम्ही अर्ज करू शकता.

pan card
Pan Card Update: लग्नानंतर लवकरात लवकर करा पॅन अपडेट अन्यथा...

ऑनलाईन पॅन कार्ड कसे बनवाल

घरबसल्या ऑनलाइन पॅन कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन 'Instant PAN through Aadhaar'वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला 'Get New PAN' हा ऑप्शन निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठविला जाईल. एकदा OTP वॅलिडेशन पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला e-PAN जारी केले जाईल.

pan card
PAN Card: पॅन कार्डवरील10 अंकांचा अर्थ काय? जाणून घ्या

का महत्त्वाचे आहे पॅन कार्ड ?

- आयटी रिटर्न्स भरण्यासाठी

- बँकेत खाते उघडण्यासाठी

- कारची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी

- टेलिफोन कनेक्शन

- 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे दागिने खरेदी करण्यासाठी

- सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करताना किंवा ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर करण्यासाठी

- इन्शुरन्स प्रीमियमसाठी

- फॉरेन एक्सचेंज, प्रॉपर्टी, लोन, एफडी, कॅश डिपॉझिट इ.च्या वेळीही पॅनकार्ड आवश्यक असते.

लाइफटाइमसाठी वॅलिड असतो पॅन कार्ड

आयकर विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, एक वेळ जारी केलेला पॅन लाइफटाइमसाठी पूर्ण देशभरात वॅलिड असतो. कर विभागाच्या मते, पॅन हे एकच असू शकतं. एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बनवणं बेकायदेशीर आहे. आयकर कायदा 1961 च्या कलम 272 बी अंतर्गत एकापेक्षा जास्त पॅनकार्ड आढळल्यास 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com