
ओपनएआय आणि मेटा किशोरवयीन मुलांसाठी चॅटबॉट्सच्या प्रतिसादात सुधारणा करत आहेत.
पालक नियंत्रण आणि तज्ज्ञ संसाधनांशी जोडणीमुळे मानसिक तणावाच्या जोखमी कमी होणार आहेत.
संशोधनात चॅटबॉट्सच्या प्रतिसादांमध्ये विसंगती आढळली, ज्यासाठी अधिक कठोर नियमांची गरज आहे.
AI Teen Support : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या ओपनएआय आणि मेटा यांनी त्यांच्या चॅटबॉट्समध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवण्याची घोषणा केली आहे. किशोरवयीन मुलं आणि मानसिक तणावग्रस्त वापरकर्त्यांच्या संवादाला अधिक प्रभावी आणि सुरक्षित बनवण्यासाठी हे बदल होत आहेत. या निर्णयामागे नुकत्याच घडलेल्या एका दु:खद घटनेची पार्श्वभूमी आहे.