OpenAI : चॅटजीपिटीवर तुम्ही सर्च केलेली माहिती होतीये लीक? कंपनीवर झालेल्या सिक्रेट सायबर अटॅकची धक्कादायक माहिती आली समोर

ChatGPT Data Leak : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संशोधनातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या OpenAI च्या सोबत घडलेला गंभीर सायबर गुन्हा उघड झाला आहे.
Cyber Attack on OpenAI in2023 Internal AI Info Compromised
Cyber Attack on OpenAI in2023 Internal AI Info Compromisedesakal

Artificial Intelligence : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संशोधनातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या OpenAI च्या सोबत घडलेला गंभीर सायबर गुन्हा उघड झाला आहे. न्यू यॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, 2023 मध्ये हॅकरने कंपनीच्या अंतर्गत संदेश प्रणाली हॅक करून त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या डिझाईनची माहिती चोरली.

हा सायबर हल्ला करणाऱ्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ऑनलाइन चर्चा फोरममधून ही माहिती मिळवली आहे. या चर्चांमध्ये OpenAIच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर चर्चा केली जात होती. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्स तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मुख्य सिस्टीममध्ये हॅकर घुसण्यात यशस्वी झाला नाही, असे वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Cyber Attack on OpenAI in2023 Internal AI Info Compromised
Airtel Data Leak : एअरटेलने दुसऱ्यांदा विकला ३७ कोटी भारतीयांचा पर्सनल डेटा? हॅकरकडून डेटा लिकच्या पुराव्यांवर कंपनी म्हणाली...

या हल्ल्याची माहिती OpenAI ने सार्वजनिकपणे दिली नाही. कंपनीच्या मते, चोरी झालेली माहिती फक्त अंतर्गत चर्चेपुरती मर्यादित होती आणि त्यामध्ये ग्राहकांची किंवा सहयोगी कंपन्यांची कोणतीही गोपनीय माहिती समाविष्ट नव्हती. याशिवाय, हल्ला करणारा हा एक स्वतंत्र गुन्हेगार असून त्याचा कोणत्याही परदेशाशी संबंध नसल्याचे कंपनीचे मत आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला याचा धोका नसल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे.

हल्ल्याची माहिती लीक झाल्यानंतर काही महिन्यांनी, मे 2023 मध्ये OpenAI ने इंटरनेटवरवर "फसव्या कारवायांसाठी" कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच गुप्त संस्थानांना उघडकीस आणले होते. या घटनेमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाची चिंता आणखी वाढली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील वेगवान प्रगती आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांमुळे नियंत्रक संस्था चिंतेत आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकन सरकार चॅटGPT सारख्या अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्सवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करत आहे.

Cyber Attack on OpenAI in2023 Internal AI Info Compromised
Email Delete : ईमेल्सचा भडिमार झालाय? आता चिंता नाही, एका क्लिकवर डिलीट करा हवे तेवढे ईमेल,वापरा सोपी ट्रिक

या घटनेमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाची शंका पुन्हा एकदा बळावली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात सध्या वेगवान प्रगती होत असताना नियंत्रणाची यंत्रणा मात्र मागे पडत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ओपनएआयच्या या हल्ल्याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com