
ओपनएआयने भारतात ‘इंडिया-फर्स्ट लर्निंग अॅक्सिलरेटर’ सुरू केले आहे
५ लाख शिक्षक-विद्यार्थ्यांना चॅटजीपीटी प्लसचे फ्री सबस्क्रिप्शन दिले जाणार आहे
हा फायदा कसा घ्यायचा सविस्तर माहिती जाणून घ्या
Free ChatGPT Plus : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ओपनएआयने भारतातील शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी ‘इंडिया फर्स्ट लर्निंग अॅक्सिलरेटर’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत देशभरातील सरकारी शाळा आणि एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांमधील ५ लाख शिक्षक आणि विद्यार्थ्यांना चॅटजीपीटी प्लसचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाणार आहे. या सबस्क्रिप्शनची मासिक किंमत १९९९ रुपये असून यात GPT-4 आणि GPT-5 सारख्या प्रगत मॉडेल्सचा समावेश आहे.