Oppo च्या A सीरीजचे दोन नवे फोन; मिळतो 50MP कॅमेरा अन् दमदार फीचर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

oppo a77s and oppo a17 available for sale in offline retail store check price features

Oppo च्या A सीरीजचे दोन नवे फोन; मिळतो 50MP कॅमेरा अन् दमदार फीचर्स

Oppo A77s आणि A17 भारतात दाखल झाले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन ऑफलाइन रिटेल स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले असून Oppo A77s 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह येतो. त्याची किंमत 17,999 रुपये आहे. Oppo A17 बद्दल बोलायचे झाले तर तो 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. Oppo ने या फोनची किंमत 12,499 रुपये ठेवली आहे. रिटेलर महेश टेलिकॉमने ट्विट करून या दोन्ही फोनच्या आगमनाची माहिती दिली आहे.

Oppo A77s चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Oppo च्या या फोन मध्ये तुम्हाला HD+ रिझोल्युशन आणि 90Hz रिफ्रेश रेट सह 6.56-इंचाचा LCD पॅनल मिळेल. फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजसह येतो. प्रोसेसर म्हणून यामध्ये स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे.फोनच्या मागील बाजूस, कंपनी एलईडी फ्लॅशसह 50-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देत आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हे फोन 5000mAh बॅटरीसह येतात, जी 33W जलद चार्जिंगला सपोर्ट देते.

हेही वाचा: Identity Theft: व्हॉट्सअ‍ॅप, OTT खात्यांसाठी फेक डिटेल्स वापरताय? होऊ शकतो १ वर्षाचा तुरुंगवास

हेही वाचा: टाटाने लॉंच केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत-रेंज

Oppo A17 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये तुम्हाला 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.56-इंचाचा डिस्प्ले मिळेल. फोन 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेजसह येतो. प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर Oppo चा हा लेटेस्ट हँडसेट MediaTek Helio G35 चिपसेट वर काम करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी मायक्रो यूएसबी पोर्टद्वारे चार्ज होते.

टॅग्स :Technology