Oppo A77s: 50MP कॅमेरा अन् 33W फास्ट चार्जिंगसह मिळेल बरंच काही, किंमत जाणून घ्या

oppo a77s launched in india with 680 soc 50 megapixel main camera check price specifications
oppo a77s launched in india with 680 soc 50 megapixel main camera check price specifications

स्मार्टफोन ब्रँड Oppo ने आपला नवीन स्मार्टफोन Oppo A77s भारतात लॉन्च केला आहे. हा फोन दोनच दिवसांपूर्वी थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आला होता. Oppo A77s स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर सह लॉन्च करण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला असून Oppo A77s मध्ये 50-मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे.

Oppo A77s ची किंमत किती

Oppo A77s स्टाररी ब्लॅक आणि सनसेट ऑरेंज रंगात सादर करण्यात आला आहे. त्याच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 17,999 रुपये आहे. 7 ऑक्टोबरपासून हा फोन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येईल. कंपनी फोनच्या खरेदीवर 10 टक्के कॅशबॅक, झिरो डाउन पेमेंट आणि ईएमआय पर्याय देखील ऑफर करणार आहे.

oppo a77s launched in india with 680 soc 50 megapixel main camera check price specifications
Elon musk : आता रोबोट करणार माणसाची कामे; टेस्लाच्या कारखान्यात प्रथम वापर

Oppo A77s चे स्पेसिफिकेशन्स

Oppo A77s मध्ये 6.56-इंचाचा HD Plus डिस्प्ले दिला आहे, जो 1612x720 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्लेसह 600 निट्सची पीक ब्राइटनेस उपलब्ध आहे. Oppo A77s सह स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. Android 12 आधारित ColorOS 12.1 फोनमध्ये उपलब्ध आहे.

oppo a77s launched in india with 680 soc 50 megapixel main camera check price specifications
शाओमीचे 200MP अन् 108MP कॅमेरे असलेले दोन फोन लॉंच, मिळेल 120W फास्ट चार्जिंग

कॅमेरा आणि बॅटरी

Oppo A77s मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सल आणि दुसरी लेन्स 2 मेगापिक्सल मॅक्रो आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

Oppo A77s ला 5000mAh बॅटरी मिळते, जी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कंपनीचा दावा आहे की फोन 71 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकतो. Oppo A77s मध्ये AI सपोर्टसह सेफ चार्जिंग फीचर देखील देण्यात आले आहे. Oppo A77s मध्ये Dual Ultra Linear Stereo स्पीकर आहेत. फोनला वॉटरप्रूफसाठी IPX4 आणि IPX5 रेटिंग मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com