Elon musk | आता रोबोट करणार माणसाची कामे; टेस्लाच्या कारखान्यात प्रथम वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk Launch Humanoid Robot

Elon musk : आता रोबोट करणार माणसाची कामे; टेस्लाच्या कारखान्यात प्रथम वापर

मुंबई : Elon Musk हे जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून ओळखले जातातच, शिवाय नवीन तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठीही त्यांची ओळख आहे. मस्कचा भविष्यातील तंत्रज्ञान तयार करण्यावर विश्वास आहे. आता त्यांची टेस्ला ऑटो पायलट कार, लोकांना मंगळावर नेण्याचा प्रकल्प, याचा प्रत्यक्ष पुरावा आहे.

मस्कने एका AI कार्यक्रमात आपला Humanoid रोबोट Optimus लाँच केला आहे. या रोबोटच्या वैशिष्ट्याने जगाला धक्का दिला आहे. एलोन मस्क यांच्या मते, त्यांचा हा रोबोट त्यांच्या कार व्यवसायात अधिक यश देईल. (Elon Musk Launch Humanoid Robot)

हेही वाचा: Twitter vs Elon Musk : ट्विटर आणि मस्क यांच्या वादात आता भारत सरकारचा उल्लेख

यंत्रमानव माणसांसारखे काम करतात

या रोबोटचा प्रोटोटाइप स्टेजवर उतरवण्यात आला असून त्यासोबत त्याचा एक व्हिडिओही दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये हा रोबोट बॉक्स उचलताना, झाडांना पाणी घालताना आणि मानवी काम करताना दिसत आहे. या कार्यक्रमात मस्क म्हणाले की, लवकरात लवकर हा ह्युमनॉइड रोबोट बनवण्याचा आमचा उद्देश आहे.

पुढील वर्षीपासून उत्पादन सुरू होऊ शकते

मस्क पुढे म्हणाले की, या रोबोटचा सर्वात महत्त्वाचा टप्पा लवकरच येणार आहे. तो अनपेक्षित परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे की नाही याची आम्ही चाचपणी करणार आहोत. मस्कने ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या AI इव्हेंटमध्ये टेस्लाच्या या रोबोटची घोषणा केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2023 पासून त्याचे उत्पादन सुरू होऊ शकते.

हेही वाचा: Work from home : रोज फक्त ३-४ तास काम करा; घरबसल्या कमवा दरमहा ८० हजार रुपये

Humanoid Robot Optimus हे काम करू शकणार आहे

इलॉन मस्क यांच्या मते, सुरुवातीला ऑप्टिमसला धोकादायक कामांमध्ये टाकून त्याची चाचणी केली जाईल. तो टेस्लाच्या कारखान्यांमध्ये वस्तू हलवण्याचे काम करेल. तो कार उत्पादनादरम्यान बोल्ट घट्ट करण्याचे काम करेल.

याशिवाय, ह्युमनॉइड रोबोट फर्म ऍजिलिटी रोबोटिक्सचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जोनाथन हर्स्ट यांनी रॉयटर्सला सांगितले की, रोबोट भविष्यात मानव जे काही करतो त्यापेक्षा बरेच काही करू शकेल. असा दावा केला जात आहे की, आगामी काळात हा रोबोट केवळ घरातील कामेच करणार नाही, तर त्याचा जोडीदार म्हणूनही वापर करता येईल.

टॅग्स :Elon MuskTesla