

Oppo Reno 17 Series Launched: 8000mAh Battery & 200MP Camera Specs
esakal
Oppo Reno 17 Series Launched: स्मार्टफोन उत्पादक कंपनी ओप्पो (Oppo) ने आपल्या होम मार्केटमध्ये म्हणजेच चीनमध्ये अधिकृतपणे नवीन Oppo Reno 17 सीरीज लाँच केली आहे. या नवीन सिरीज अंतर्गत कंपनीने Reno 17 आणि Reno 17 Pro हे दोन प्रीमियम स्मार्टफोन्स बाजारात आणले आहेत. आकर्षक डिझाइन, हाय-एंड फीचर्स आणि उत्कृष्ट परफॉर्मन्समुळे या फोनची जोरदार चर्चा सुरू आहे.
हे दोन्ही स्मार्टफोन्स टच रिस्पॉन्स आणि उत्तम नेटवर्क कनेक्टिव्हिटीसाठी विशेष चिपसह सुसज्ज आहेत. तसेच, गेमिंगप्रेमींसाठी यात 120fps गेमिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हे फोन अँड्रॉइड 17 (Android 17) वर आधारित ColorOS 17 वर काम करतात.