Oppoचा 5G स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत

हा फोन आता कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरद्वारे स्पेनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे, Oppo ने म्हटले आहे की तो Reno 8 Lite 5G ला इतर मार्केटमध्ये लॉन्च करेल.
Reno 8 Lite 5G
Reno 8 Lite 5Ggoogle

मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माता Oppo ने आपल्या Reno 8 मालिकेत Reno 8 Lite 5G लॉन्च केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Oppo Reno 7 Lite चे अपग्रेड व्हर्जन आहे. हा स्मार्टफोन स्पेनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा, 4500mAh बॅटरी, शक्तिशाली प्रोसेसरसह येतो. चला तर मग एक जाणून घेऊ या स्मार्टफोनची किंमत.

Oppo Reno 8 Lite 5G किंमत

स्पेनमध्ये, Reno 8 Lite 5G ची किंमत सुमारे ३५ हजार ५०० रुपये EUR 429 आहे. हा स्मार्टफोन तुम्ही ब्लॅक आणि रेनबो या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. हा फोन आता कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरद्वारे स्पेनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे, Oppo ने म्हटले आहे की तो Reno 8 Lite 5G ला इतर मार्केटमध्ये लॉन्च करेल.

Oppo Reno 8 Lite 5G वैशिष्ट्ये

Reno 8 Lite 5G मध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंचाचा फुलएचडी एमोलेड डिस्प्ले आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर म्हणून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिप वापरण्यात आली आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सह येतो. यात मायक्रोएसडी कार्ड आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकता.

Oppo Reno 8 Lite 5G मध्ये 64-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मोनोक्रोम कॅमेरा असलेला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Reno 8 Lite 5G ला 4500mAh बॅटरी समर्थित आहे, जी 33W गतीपर्यंत चार्ज होते. तुम्हाला Reno 8 Lite वर सॉफ्टवेअर म्हणून Android 12-आधारित ColorOS 12 मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com