उद्या येतोय OPPO चा नवीन 5G स्मार्टफोन; लॉंचपूर्वीच फोटो लीक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 5g smartphone

उद्या येतोय OPPO चा नवीन 5G स्मार्टफोन; लॉंचपूर्वीच फोटो लीक

जर तुम्ही 5G फोन घेण्याचा विचार करत असाल तर एक दमदार 5G स्मार्टफोन बाजारात येत आहे. Oppo Reno 8Z 5G हा फोन उद्या म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी बाजारात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. काही लिक्समधून या डिव्हाइसचे अपेक्षित प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज तपशील उघड केले आहेत आणि आता एका नवीन अपडेटमध्ये, Oppo Reno 8Z 5G चे फोटो देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये फोनचे डिझाइन आणि इतर फीचर्स देखील समोर आले आहेत.

हा फोन दोन कलर ऑप्शनमध्ये दिसत आहे आणि LED फ्लॅशसह मागील बाजूस ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 695 चिप सह येण्याची शक्यता आहे. Oppo Reno 8Z 5G हा 4 ऑगस्ट रोजी लॉन्च होईल.

टिपस्टर पारस गुगलानी (@passionategeekz) ने MobileTalk च्या सहकार्याने Oppo Reno 8Z 5G चे डिझाइन उघड करणारा फोटो लीक केला आहे. हा फोन 4 ऑगस्ट रोजी निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये लॉन्च केला जाईल.

हेही वाचा: OnePlus चे सर्वात स्वस्त इयरबड लॉन्च, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

Oppo Reno 8Z 5G अलीकडेच तैवानमधील गीकबेंच बेंचमार्किंग वेबसाइट आणि नॅशनल कम्युनिकेशन्स कमिशन (NCC) वेबसाइटवर दिसला होता. गीकबेंच लिस्टींगनुसार, स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपद्वारे समर्थित असेल आणि यामधेये 8 जीबी रॅम देखील मिळेल. हे आउट-ऑफ-द-बॉक्स Android 12 वर चालू शकते.

NCC लिस्टींगमध्ये Oppo Reno 8Z 5G वर 33W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टसह 4500mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. यात 3.5 मिमी हेडफोन जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि तळाशी स्पीकर ग्रिल समाविष्ट असल्याचे सांगितले जाते. हा फोन तीन 6GB+128GB, 8GB+128GB आणि 8GB+256GB इंटरनल मेमरी आणि रॅम कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Jio Vs Vi : तुमच्यासाठी 399 रुपयांचा कोणता पोस्टपेड प्लॅन आहे बेस्ट?

Web Title: Oppo Reno 8z 5g Smartphone Image Leak Check Launch Date And All Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :New 5G Mobile