esakal | कालेयचा 'उल्का वर्षाव' पाहण्याची संधी; पृथ्वीवर घडणार अनोखा 'आविष्कार' I Draconids Meteor
sakal

बोलून बातमी शोधा

Draconids meteor shower

जगभरातील खगोलप्रेमी ज्या अलौकिक खगोलीय आविष्काराची आतुरतेने वाट पाहत असतात, तो 'कालेयचा उल्कावर्षाव' ऑक्टोबरच्या ७, ८, ९ या तीन तारखांना घडणार आहे.

कालेयचा 'उल्का वर्षाव' पाहण्याची संधी; पृथ्वीवर घडणार अनोखा 'आविष्कार'

sakal_logo
By
संदीप गाडवे

हेही वाचा: इंद्रजाल, मांडूळ, घुबड, कासवामुळे खरंच धन लाभ होतो?

जगभरातील खगोलप्रेमी ज्या अलौकिक खगोलीय आविष्काराची आतुरतेने वाट पाहत असतात, तो 'कालेयचा उल्कावर्षाव' ऑक्टोबरच्या ७, ८, ९ या तीन तारखांना घडणार आहे. त्यातही ८ तारखेला खास महत्व आहे, कारण त्यादिवशी उच्चांकी वर्षाव होणार आहे. या दिवसाला peak day of meteor shower म्हणतात, अशी माहिती खगोलशास्त्र अभ्यासक शंकर शेलार यांनी दिली.

हा वर्षाव पाहण्यासाठी योग्य वेळ सूर्यास्तानंतरची (early evening) आहे. या वर्षावाचा उगमबिंदू (radiant), कालेय (Draco) तारका समूहात दिसतो, म्हणून यास 'कालेयचा उल्कावर्षाव' (Draconids meteor shower) असंही संबोधतात. सूर्यास्तानंतर वायव्य दिशेला (north west ) हा आविष्कार पाहायला मिळेल. उत्तर आकाशात ध्रुव (Polaris) ताऱ्याभोवती सप्तर्षी (Ursa major) आणि ध्रुवमत्सय (Ursa minor) या तारका समूहांदरम्यान सुरु होऊन, अभिजीत (Vega) या ताऱ्याजवळ पोहोचणाऱ्या १३-१४ ताऱ्यांचा मिळून बनलेला कालेय नावाचा सर्पाच्या आकाराचा एक तारका समूह आहे. अभिजीतच्या पूर्वेस चार ताऱ्यांनी बनलेली ही सर्पाच्या नागफनासारखी दिसते. तेथून उल्का पडताना दिसतील. शिवाय, आकाशात इतरत्रही उल्का पाहायला मिळतील. या वर्षावात उल्का पडण्याचा दर ताशी १० पर्यंत असतो.

हेही वाचा: ऑलिम्पियन नीरज चोप्राची Style भाल्यापेक्षा महागडी

ड्रॅकोनिड्स वर्षाव हा '21p/ Giacobini-zinner' या धूमकेतूमधून त्याच्या भ्रमण मार्गावर पडलेल्या कचऱ्यामुळे (debris) घडतो. सूर्य प्रदक्षिणेवेळी पृथ्वी दरवर्षी ६ ते १० ऑक्टोबर दरम्यान या कचऱ्याच्या पट्ट्यातून पुढे जात असते. गुरुत्वाकर्षणामुळे हा कचरा पृथ्वीच्या वातावरणात घुसतो, आणि घर्षणाने पेट घेतो. 21p/Giacobini-zinner हा धूमकेतू दर ६.६ वर्षांनी सूर्य प्रदक्षिणा घालतो. २०१८ साली तो सूर्यमालेत येऊन गेला आहे. आता २०२५ साली तो पुन्हा येईल. तो जेंव्हा येऊन जातो, त्यावर्षी भरपूर प्रमाणात जोरदार उल्कावर्षाव घडतो. २०११ साली युरोपमधून ताशी ६०० पर्यंत उल्का पडताना दिसल्या होत्या. १९३३, १९४६ साली ताशी हजारोच्या संख्येने उल्का कोसळताना पाहायला मिळाल्याची नोंद आहे.

हेही वाचा: खुशखबर! इंडियन आर्मीत NCC भरती; तब्बल 2.50 लाख मिळणार पगार

असा हा कालेयचा उल्कावर्षाव (Draconids) उत्तर गोलार्धातून चांगला पाहायला मिळतो. या काळात शुक्ल पक्षातील द्वितीया /त्रितीयेची लहान चंद्रकोर असून, ती लवकरच मावळत असल्याने, निरीक्षणात चंद्रप्रकाशाचा अडथळा जाणवणार नाही. उल्कावर्षाव चांगला दिसण्यासाठी शहरी लाईट्स आणि प्रदूषित वातावरण यापासून दूर, अंधाऱ्या ठिकाणी, मैदान किंवा टेकडीवर जावे. अशा ठिकाणांवरून हा खगोलीय आविष्कार छान दिसतो.

loading image
go to top