
Blinkit iPhone 17 Fast Delivery Features Price
esakal
आयफोन 17 सिरीज नुकतीच लॉंच झाली आहे
आजपासून स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे
पण दुकानाबाहेर रांगेत न थांबता घरबसल्या मोबाईल कसा मिळवायचा जाणून घ्या
iPhone 17 Home Delivery : अॅपलच्या नवीन iPhone 17 सीरिजची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आयफोन प्रेमींसाठी एक जबरदस्त बातमी आहे. आता तुम्हाला दुकानासमोर रांगा लावून वाट पाहण्याची गरज नाही. ब्लिंकिट अॅपवरून फक्त 10 मिनिटांत iPhone 17, iPhone एअर, iPhone 17 प्रो आणि iPhone 17 प्रो मॅक्स मिळवण्याची सोपी ट्रिक आता उपलब्ध आहे. ही सेवा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून जागतिक लाँचच्या त्या दिवशीच तुम्ही ऑर्डर देऊ शकता. या इन्स्टंट डिलिव्हरीने आयफोन खरेदीचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे