Sundar Pichai | पद्मभूषण प्राप्त करणारे सुंदर पिचई कोणत्या देशाचे नागरिक आहेत ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sundar Pichai

Sundar Pichai : पद्मभूषण प्राप्त करणारे सुंदर पिचई कोणत्या देशाचे नागरिक आहेत ?

मुंबई : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म भूषण’ प्रदान करण्यात आला. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्या हस्ते व्यापार आणि उद्योग प्रकारात २०२२ या वर्षासाठी पिचाई यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हेही वाचा - वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

सुंदर यांचा जन्म १० जून १९७२ रोजी तमिळनाडू येथील चेन्नई येथे झाला. त्यांचे वडील एका ब्रिटीश बहुराष्ट्रीय कंपनीत इलेक्ट्रीकल इंजिनिअर होते. लहान वयातच सुंदर यांना तंत्रज्ञानाची ओढ लागली. तसेच त्यांच्याकडे असामान्य बुद्धिमत्ता असल्याचे दिसून आले.

१९९३ साली त्यांनी आयआयटी खरगपूर येथून रौप्य पदकासह बीटेक पदवी प्राप्त केली. त्याच वेळी त्यांना स्टॅनफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. १९९५ साली शिक्षण पूर्ण केल्यानंतरही ते अमेरिकेतच राहिले. २००२ साली त्यांनी एमबीए पूर्ण केले.

२००४ साली सुंदर गुगलमध्ये 'प्रोडक्ट मॅनेजमेंट अॅण्ड डेव्हलपमेंट' विभागाचे प्रमुख म्हणून रुजू झाले. २००८ साली सुरू झालेल्या गुगल क्रोमच्या जडणघडणीतही त्यांचा सहभाग होता. त्यानंतर त्यांनी गुगलमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली.

दरम्यानच्या काळात मायक्रोसॉफ्ट आणि ट्विटरकडूनही त्यांना ऑफर मिळाल्याची चर्चा होती; मात्र भरभक्कम वेतन देऊन गुगलने त्यांना आपल्याकडेच राहण्यास भाग पाडले. अखेर २०१५ साली गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले.

मूळचे भारतीय असलेले सुंदर पिचई इतकी वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर आता अमेरिकेचे नागरिक बनले आहेत. त्यांना पद्मभूषण हा भारतातील मानाचा नागरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.