भारत- पाकिस्तान आता अंतराळातही भिडणार 

वृत्तसंस्था
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : भारत व पाकिस्तानमधील संबंधांची चर्चा सतत होत असते. खेळ, राजकारणात प्रतिस्पर्धी असलेल्या या देशांमधील स्पर्धा आता अंतराळतही दिसणार आहे. अंतराळ कार्यक्रमात भारताची बरोबरी करीत आता अवकाशात मानवाला पाठविण्याची तयारी पाकिस्तान करीत आहे. 

अंतळात मानवाला पाठविण्याचा मनसुबा पाकिस्तानचा असला तरी, या क्षेत्रात तो आत्मनिर्भर नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चीनच्या दौऱ्यावर जाणार आहे. तेथे या दोन्ही देशांमध्ये अंतराळ मोहिमेचा करार होण्याची शक्‍यता आहे.

पाकिस्तानला चीनकडून तांत्रिक गोष्टींसह आर्थिक मदत मिळू शकते. चीनच्या बळावरच पाकिस्तानची ही अंतराळ मोहीम साकार होऊ शकते. या उलट अंतराळ कार्यक्रमात भारताची कामगिरी लक्षणीय आहे. मंगळयान हा भारताच्या प्रगतीचा ऐतिहासिक टप्पा आहे. मानवासह यान अंतराळात पाठविण्याचे स्वप्न भारताचे असून त्यादृष्टीने तयारीही सुरू झालेली आहे. यासाठी रशियाशी करार करण्याची चर्चा असली तरी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. 

जर पाकिस्तान 2022 पर्यंत या मोहिमेत यशस्वी झाला तर भारताबरोबर तेथेही त्याची स्पर्धा दिसेल. 'जर सर्व काही व्यवस्थित झाले तर 2022 मध्ये पाकिस्तानही अवकाशात आपला झेंडा फडकावेल, असे पाकिस्तानचे माहितीमंत्री फवाद चौधरी यांनी नुकतेच जाहीर केले. यासाठी चीन व पाकिस्तानमध्ये 'स्पेस अँड अप्पर ऍटमॉसफायर रिसर्च कमिशन' (एसयूपीएआरसीओ) अंतर्गत एका करारावर स्वाक्षरीही झाली आहे. पाकिस्तानची ही पहिलीच अंतराळ मोहीम असेल. 

अवकाशातही 'महामुकाबला' 
भारत आणि पाकिस्तान 2022 मध्ये मानवसहित यान अंतराळात पाठविणार असले तरी आशियाई देशांमध्ये यात चीनने आघाडी घेतलेली आहे. चीनने 2003 मध्ये असे यान पाठविले आहे. रशिया आणि अमेरिकेनंतर अंतराळात मानवाला पाठविणारा चीन हा जगातील तिसरा देश आहे. या रांगेत आता भारत बसणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेला 'गगनयान' असे नाव दिले आहे. पाकिस्तानही या स्पर्धेत उतरण्याची तयारी करीत असल्याने अवकाशातही लवकरच 'महामुकाबला' दिसेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan aims to sent a man in space with the help from China