NASA : आदित्यजवळ जाण्याचा ‘पार्कर’चा पुन्हा विक्रम; सौरयानाची तीन महिन्यांत दुसरी वेळ
Sun Exploration : नासाच्या पार्कर सोलर प्रोबने सूर्याच्या वातावरणाचा वेध घेत दुसऱ्यांदा सूर्याच्या सर्वांत जवळ पोहचून विक्रम केला आहे. हे सौरयान तीन महिन्यांच्या अंतराने सूर्याच्या बाहेरील वायूमंडलाभोवती फिरत आहे.
वॉशिंग्टन : सूर्याच्या वातावरणाचा वेध घेण्यासाठी ‘नासा’चे ‘पार्कर सोलर प्रोब’ हे मानवरहित अवकाशयान २०१८ अवकाशात झेपावले होते. त्यानंतर हे सौरयान दुसऱ्यांदा सूर्याच्या सर्वांत जवळ पोहचले असून ते या महाकाय ताऱ्याच्या बाहेरील वायूमंडलाभोवती फिरत आहे.