
AI Generated Fake News Laws Deepfake Detection
esakal
AI Fake News Controlling Rules : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांवर अंकुश ठेवण्यासाठी संसदीय समितीने नवीन कायदे आणि तंत्रज्ञान विकसित करण्याची शिफारस केली आहे. संचार आणि माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीने आपल्या अहवालात खोट्या बातम्यांचा प्रसार करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर कारवाईसाठी ठोस उपाययोजना सुचवल्या आहेत. भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या नेतृत्वाखालील हा अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर करण्यात आला असून पुढील अधिवेशनात तो संसदेत मांडला जाणार आहे.