Iltija Mufti Cyber Threat: मेहबूबा मुफ्तीच्या मुलीने असं काय केलं ज्याने मिळाला सायबर थ्रेट? ट्विट करत दिली धक्कादायक माहिती

Mehbooba Mufti Daughter: मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती हिला अॅपलकडून स्पायवेअरची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Spyware Controversy  Iltija Mufti Receives Threat Notification
Spyware Controversy Iltija Mufti Receives Threat Notificationesakal

Cyber Security : मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती हिला अॅपलकडून स्पायवेअरची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुधवारी तिने या विषयी माहिती दिली. तिला तिच्या आयफोनला स्पायवेअरने टार्गेट केल्याचे अॅपलने कळवले होते. इल्तिजाने X वर 98 देशांतील वापरकर्त्यांना पाठवलेल्या अलर्टचे स्क्रीनशॉट शेअर केले.

इल्तिजाने सांगितले की तिला हा अलर्ट iMessage आणि ईमेलद्वारे मिळाला. तिच्या राजकीय वर्तुळात इतर कोणालाही हा अलर्ट मिळाला नसल्याचे तिने नमूद केले. "माझ्या राजकीय वर्तुळात मला एकटीला हा अलर्ट मिळाला आहे. मी राजकीयदृष्ट्या जास्त सक्रिय नाही, पण मी या सरकारवर टीका केली आहे, त्यामुळे मला टार्गेट का केले हे कळत नाही," असे तिने म्हटले.

इल्तिजाने सरकारवर राजकीय विरोधकांवर नजर ठेवण्यासाठी स्पायवेअरचा वापर केल्याचा आरोप केला. "भारतीय नागरिक म्हणून मला माझ्या जीवनात गोपनीयतेचा हक्क आहे. हे आम्हाला गप्प करण्याचे धोरण आहे कारण सर्वांना माहित आहे की मेहबूबा मुफ्ती आणि मी या सरकारच्या जम्मू-काश्मीरच्या राज्यत्वाबद्दलच्या धोरणांवर टीका करत आहोत," असे तिने सांगितले.

Spyware Controversy  Iltija Mufti Receives Threat Notification
Cyber Crime Complaint : सायबर फ्रॉड झालाय पण तक्रार कशी करायची माहिती नाही? या सोप्या स्टेप्समध्ये नोंदवा ऑनलाईन तक्रार

इल्तिजाने सांगितले की हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे. "सरकारने एनएसओ ग्रुपकडून हे महागडे स्पायवेअर खरेदी केले आहे जे फक्त सरकारलाच विकले जाऊ शकतो. ते माझ्यावर नजर का ठेवत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मी एक सामान्य नागरिक आहे. जरी मी एक राजकारणी असते, तरी हे योग्य नाही. त्यांनी महिलांवर पाळत ठेवण्याचा दुर्दैवी इतिहास आहे, ज्यात सागरिका घोष आणि महुआ मोइत्रा यांच्यासारख्या तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांचाही समावेश आहे,अश्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.

इल्तिजाने अॅपलच्या सल्ल्यानुसार लॉकडाउन मोड चालू केले आहे. यामुळे तिचा फोन स्लो झाला आहे. "माझा फोन कितपत धोक्यात आहे हे मला माहित नाही, यामुळे मी चिंतित आहे. पेगासससारखे स्पायवेअर वापरण्यात आले आहे. त्यामुळे माझा फोन एक बग झाला आहे. मी सायबर तज्ञांशी संपर्क साधत आहे," असे त्यांनी सांगितले.

Spyware Controversy  Iltija Mufti Receives Threat Notification
Bumble Free Tips : लगेच प्रीमियम सब्स्क्रिप्शनची गरज नाही, Bumble वर वापरता येतात हे फ्री फीचर्स, कसे कराल अनलॉक?

या घटनेमुळे सायबर सुरक्षेची सध्या काय स्थिति आहे आणि फक्त सामान्य लोकच नाही तर राजकीय व्यक्ति देखील याचे शिकार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे तुम्ही देखील मोबाईल आणि इलेक्ट्रोनिक डिव्हाईसच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com