अंटार्टिकातील निर्जन बेटावर आढळले 15 लाख पेंग्विन

वृत्तसंस्था
शनिवार, 3 मार्च 2018

सदरचे बेट हे पेंग्विनसाठी ओळखले जात नव्हते. लॅंडसॅट उपग्रहाची माहिती चुकीची असल्याचा आमचा समज होता. मात्र, पाहणी केली असता समोर आलेली माहिती धक्कादायक आमच्यासाठी आश्‍चर्यकारक होती. आपण या प्रदेशाचे व्यवस्थापन कसे करतो. याचे ते वास्तविक परिणाम आहेत.
- हीदर लिंच, स्टोनी ब्रूक विद्यापीठाचे सहअभ्यासक

पॅरीस - पूर्व अंटार्टिकातील एका निर्जन बेटावर अदेली प्रजातीतील सुमारे 15 लाख पेंग्विन आढळून आले असून, यामुळे आपल्याला आश्‍चर्याचा धक्का बसल्याची माहिती शास्त्रज्ञांनी आज दिली.

जागतिक हवामान बदलामुळे येथील बर्फ वितळत असून, त्याचा परिणाम पेंग्विनवर होत आहे. त्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. स्थलांतर केलेले पेंग्विन पश्‍चिम अंटार्टिकापासून सुमारे 160 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका बेटावर आढळून आले असून, हे बेट शक्‍यतो वर्षभर बर्फाने आच्छादलेले असते. अगदी उन्हाळ्यातसुद्धा तेथे एखादी पाहणीसाठी जाणे अवघड ठरते. नासाच्या लॅंडसॅट या उपग्रहाकडून मिळालेल्या डेटावरुन सर्वप्रथम या बेटावर पेंग्विनचे अस्तित्व अधोरेखित झाले होते.

नुकत्याच झालेल्या गणणेनुसार, या बेटावर पेंग्विनच्या सुमारे 7 लाख 50 हजार जोड्या व अदेली प्रजातीतील पेंग्विन असल्याचे स्पष्ट झाले. ही संख्या उर्वरित अंटार्टिकावरील पेंग्विनच्या तुलनेत जास्त असल्याचे पाहणी पथकाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

सदरचे बेट हे पेंग्विनसाठी ओळखले जात नव्हते. लॅंडसॅट उपग्रहाची माहिती चुकीची असल्याचा आमचा समज होता. मात्र, पाहणी केली असता समोर आलेली माहिती धक्कादायक आमच्यासाठी आश्‍चर्यकारक होती. आपण या प्रदेशाचे व्यवस्थापन कसे करतो. याचे ते वास्तविक परिणाम आहेत.
- हीदर लिंच, स्टोनी ब्रूक विद्यापीठाचे सहअभ्यासक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: penguins discovered in Antarctica