NASA च्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावरुन पाठवली पहिली ऑडिओ क्लिप; लँडिंगचा VIDEOही जारी

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 23 February 2021

अमेरिकेची स्पेस एजेन्सी नासाने (NASA) सोमवारी मंगळ ग्रहावरुन पहिला ऑडिओ जारी केला आहे. हा व्हिडिओ नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरच्या माध्यमातून रिकॉर्ड करण्यात आला आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेची स्पेस एजेन्सी नासाने (NASA) सोमवारी मंगळ ग्रहावरुन पहिला ऑडिओ जारी केला आहे. हा व्हिडिओ नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरच्या माध्यमातून रिकॉर्ड करण्यात आला आहे. यामध्ये हवेचा आवाज रिकॉर्ड झाला आहे. याशिवाय नासाने लाल ग्रहावरील (मंगळ) रोव्हर्सच्या लँडिंगचा पहिला व्हिडिओही जारी केला आहे. अमेरिकेच्या अवकाश एजेन्सीने सांगितलं की, रोव्हर मंगळवारी मंगळ ग्रहावर उतरला तेव्हा त्याचा मायक्रोफोन काम करत नव्हता. पण, आता मायक्रोफोन काम करु लागला आहे. 

Gujarat MC Election Result Update: भाजपची भक्कम आघाडी; सूरतमध्ये 15 जागांवर आप...

पर्सिव्हरन्सचे कॅमेरा आणि मायक्रोफोन सिस्टमचे लीड इंजीनियर डेव ग्रुएल यांनी सांगितलं की, 10 सेकंदाच्या ऑडिओमध्ये तुम्हा हवेचा आवाज ऐकत आहात. याला मंगळ ग्रहावरील मायक्रोफोनच्या माध्यमातून रिकॉर्ड करण्यात आले आहे. त्यानंतर याला पृथ्वीवर पाठवण्यात आले आहे. 

नासाकडून जारी करण्यात आलेल्या हाय डेफिनेशन व्हिडिओमध्ये म्हणण्यात आलंय ती,पर्सिव्हरन्स रोव्हरला एका लाल आणि पांढऱ्या रंगाच्या पॅराशूटच्या सहाय्याने मंगळावर उतरवण्यात आले. हा व्हिडिओ 3 मिनिटे 25 सेकंदाचा आहे. यामध्ये धुळीच्या लोटामध्ये रोवरला लँडिंग करताना दाखवले आहे. नासाचे जेट प्रोपल्शन लेबोरेटरीचे अधिकारी मायकल वाटकिंस म्हणाले की, ही पहिलीच वेळ आहे की आपण मंगळावरील एका उपक्रमाचा व्हिडिओ शूट केला आहे. हा एक अद्भूत व्हिडिओ आहे. 

22 वर्षांपूर्वी गँगरेप प्रकरणामुळे मुख्यमंत्र्यांनी दिला होता राजीनामा; आरोपीला...

अंतराळातील तब्बल सात महिन्यांच्या प्रवासानंतर अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे ‘पर्सिव्हरन्स’ हे आकाराने सर्वांत मोठे आणि अत्याधुनिक रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले. या रोव्हरच्या माध्यमातून मंगळ ग्रहावरील सजीवसृष्टीचा वेध घेण्यात येईल. नासाने या रोव्हरच्या निर्मितीसाठी  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला होता. मागील वर्षी ३० जुलै रोजी ‘मंगळ-२०२०’ या मोहिमेला सुरुवात झाली होती.  

अमेरिकेच्या फ्लोरिडातील केप कॅनव्हारल येथील प्रक्षेपण केंद्रावरून हे यान अवकाशामध्ये झेपावले होते. हे रोव्हर पृथ्वीपासून ४७२ दशलक्ष किलोमीटर अंतरावर पोचल्यानंतर ते मंगळाच्या पृष्ठभागावर असलेल्या एका मोठ्या विवरात सुरक्षितपणे उतरले, असे नासाने म्हटले आहे. या रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या उतरणे हे सर्वांत मोठे यश असल्याचे नासाकडून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: perseverance rover landing mars audio video clip shear nasa