esakal | 22 वर्षांपूर्वी गँगरेप प्रकरणामुळे मुख्यमंत्र्यांनी दिला होता राजीनामा; आरोपीला महाराष्ट्रात अटक
sakal

बोलून बातमी शोधा

odisha crime news

तीन महिन्यांपासून आरोपीला पकडण्यासाठी ऑपरेशन सायलेंट वायपर सुरु करण्यात आले होते. यानतंर आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. 

22 वर्षांपूर्वी गँगरेप प्रकरणामुळे मुख्यमंत्र्यांनी दिला होता राजीनामा; आरोपीला महाराष्ट्रात अटक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भुवनेश्वर - ओडिसामध्ये आयएफएस अधिकाऱ्याच्या पत्नीवर सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री जे बी पटनायक यांना 1999 मध्ये राजीनामा द्यावा लागला होता. 

कटक पोलिस आयुक्त एस सारंगी यांनी सोमवारी सांगितले की, विवेकानंतर बिस्वाल उर्फ बिबनला महाराष्ट्रातील लोणावळ्यात अटक करण्यात आले. बिबल या ठिकाणी जालंधर स्वॅन अशा खोट्या ओळखीसह प्लंबरचं काम करत होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तीन महिन्यांपासून आरोपीला पकडण्यासाठी ऑपरेशन सायलेंट वायपर सुरु करण्यात आले होते. यानतंर आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. 

हे वाचा - हद्दच झाली! मास्कशिवाय फिरणारा आमदार म्हणतो, 'मी बाजरीची भाकरी खातो, कोरोना कसा होईल?'

सामुहिक बलात्कार प्रकरणी तीन जणांवर आरोप आहे. यातील दोघांना आधीच अटक कऱण्यात आली होती आणि दोषीही आढळले होते. बिबनने मात्र दोन दशकांपासून पोलिसांना गुंगारा दिला होता. याप्रकरणी एक दोषी प्रदीप साहू याचा गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रुग्णालयामध्ये उपचारावेळी मृत्यू झाला होता. सर्वात आधी 15 जानेवारी 1999 रोजी प्रदीप साहूला अटक करण्यात आली होती. 

सामुहिक बलात्कार प्रकरणाची ही घटना 9 जानेवारी 1999 मध्ये घडली होती. बारंगा इथं महिलेची कार थांबवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. महिला तिच्या पत्रकार मित्रास कारने कटकला जात होती. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत होते. आता अटक कऱण्यात आलेला आरोपी बिबनला सीबीआयकडे सोपवण्यात येईल. पीडित महिलेनं मुख्य आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे. 

हे वाचा - देशात कोरोनाची आकडेवारी देतेय धोक्याचा इशारा; महाराष्ट्र, केरळमध्ये चिंता

पीडीत महिलेनं आपल्यावर झालेला अत्याचार हा पूर्वनियोजित होता आणि 1997 मध्ये दाखल केलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी हे केलं गेलं असा आरोप केला होता. पीडितेनं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री पटनायक यांच्यावर आरोप केला होता की, ते अॅडव्होकेट जनरला यांना वाचवत आहेत. या आरोपनंतर अॅडव्होकेट जनरलनी 1998 मध्ये राजीनामा दिला होता.