esakal | 53 कोटी युजर्सचा डेटा लिक झाल्याप्रकरणी फेसबुकचे स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

facebook_1

काही दिवसांपूर्वी  फेसबुकच्या ५३ कोटी युजर्सचा डेटा ऑनलाईन पद्धतीने विकला गेल्याची बातमी समोर आली होती. सोशल मीडिया कंपनी फेसबुकने याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे

53 कोटी युजर्सचा डेटा लिक झाल्याप्रकरणी फेसबुकचे स्पष्टीकरण

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- काही दिवसांपूर्वी  फेसबुकच्या ५३ कोटी युजर्सचा डेटा ऑनलाईन पद्धतीने विकला गेल्याची बातमी समोर आली होती. सोशल मीडिया कंपनी फेसबुकने याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. युजर्सचा विकला गेलेला डेटा फेसबुकला हॅक करुन मिळवण्यात आलेला नाही. हॅकर्स कंपनीच्या सिस्टिममध्ये शिरले नव्हते, तर कॉन्टक्ट लिस्टमध्ये असलेल्या मित्रांचा शोध घेण्यासाठी असलेल्या काही ऍप्सचा वापर करत ५० कोटींपेक्षा अधिक युजर्चचा डेटा मिळवण्यात आलाय. ज्यांनी युजर्सचा डेटा मिळवला त्यांनी सिस्टिम हॅक केला नाही, तर उपलब्ध असलेल्या काही अॅप्सच्या माध्यमातून त्यांना हा डेटा मिळवला आहे. फेसबुकचे प्रोडक्ट मॅनेजमेंट डायरेक्टर माईक क्लार्क यासंबंधी माहिती दिली आहे. फेसबुकच्या युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. त्यामुळे युजर्सचा खासगीपण जपणं फेसबुकसाठी एक आव्हान ठरलं आहे. 

फेसबुकचा डेटा पुन्हा एकदा लीक झाल्याचा प्रकार समोर आला होता. यामध्ये जवळपास 100 देशांमधील 53 कोटी युजर्सचा डेटा लीक झालाय. लीक झालेल्या डेटामध्ये युजरचं नाव, जेंडर, व्यवसाय, विवाहित आहे की नाही, रिलेशनशिप स्टेटस, ऑफिस जॉइन केल्याची तारीख इत्यादी माहितीचा समावेश आहे. मध्ये युजर्सच्या खासगी माहिती चोरण्यात आली आणि त्या इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आली. पहिल्यांदा 2019 मध्ये डेटा लीक झाला होता. त्याची विक्री टेलिग्रामवर प्रत्येक सर्चसाठी 20 डॉलर इतक्या दराने होत होती. तेव्हा फेसबुकने सुरक्षेतील त्रुटीमुळे डेटा लीक झाल्याचं म्हटलं होतं. 

गेल्या वर्षी जून 2020 आणि जानेवारी 2021 मध्ये पुन्हा डेटा लीक झाला होता. विशेष म्हणजे यावेळीही डेटा लीक आधीसारखाच सुरक्षेच्या त्रुटीमुळे झाल्याचं समोर आलं होतं. या डेटा लीकमुळे युजर्सना एखाद्या व्यक्तीचा नंबर सहज शोधता येतो हडसन रॉक या सायबर सिक्युरीटी फर्मचे सीईओ अॅलन गल यांनी पहिल्यांदा ही बाब निदर्शनास आणून दिली होती.

लसीकरणाचा खरंच फायदा होतो? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं

गल यांनी एकदा ट्विटरवून नवीन डेटा लीक झाल्याची माहिती शेअर केली. त्यांनी म्हटलं होतं की, ज्यांचे फेसबुक अकाउंट आहे ते हॅक झाल्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा डेटा लीक झाला असून त्यामध्ये अफगाणिस्तानचे 5.5 लाख युजर्स, ऑस्ट्रेलियाचे 12 लाख युजर्स, बांगलादेशातील 38 लाख युजर्स, ब्राझीलमधील 80 लाख तर भारतातील 61 लाख युजर्सचा डेटा लीक झाला असल्याचा दावा गल यांनी केला होता. 

धार्मिक भावना दुखावण्याचं स्वातंत्र्य अभिव्यक्तीच्या अधिकारात नाही

डेटा लीकचे प्रकार रोखण्यासाठी भारतात सध्या तरही कोणतीच व्यवस्था नाही. डेटा संरक्षण आणि त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाईची तरतूद नाही. यासंदर्भातील डेटा संरक्षण विधेयक हे 2019 पासून लोकसभेत मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.  या विधेयकावर संसेदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत वाढवून घेतली होती. सध्या माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत जितकी सुरक्षा मिळते ती यासाठी पुरेशी नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

loading image